Weather Alert: थंडी, धुके अन् हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अलर्ट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. डिसेंबरअखेर हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका वाढला असून बहुतांश भागात पारा 10 अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील गारठा वाढला असून सकाळी थंडी तर दुपारी उबदारपणा जाणवत आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला थंडीची हुडहुडी अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमानात चढउतार होत असताना आज 30 डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवलीसह इतर भागातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याणमध्ये पारा घसरला असून गारठा वाढला आहे. पुढील काही दिवसांपर्यंत हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून हवामान स्वच्छ आणि उष्ण असणार आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असताना, डोंबिवली शहरात 30 डिसेंबर रोजी किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि संध्याकाळ जास्त थंडी तर दिवसा उबदार हवामान राहील.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात थंडीची लाट असूनही, दिवसा उन्ह तापत आहे. तर सकाळ- संध्याकाळ थंडी असेल. कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात शहरापेक्षा जास्त थंडी जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बदलापूर शहरात 30 डिसेंबर रोजी हवामान आल्हाददायक राहील. सोमवारची हवामान स्थिती कायम राहणार असून कमाल तापमान 32 अंश तर किमान 16 अंश सेल्सिअस राहील. मुरबाड, शहापूर तालुक्यातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि थंड असेल. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. गारठा वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: थंडी, धुके अन् हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अलर्ट