TRENDING:

2007, 2011, 2026! भारत पुन्हा विश्वविजेता, तिसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनचे 'केरळम' कनेक्शन; अजब योगायोग पाहून व्हाल थक्क

Last Updated:

India Victory: भारताने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंर एक रंजक योगायोग पुन्हा समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
क्रिकेटमध्ये काही योगायोग इतके रंजक असतात की ते चाहत्यांना वर्षानुवर्षे आठवत राहतात. भारताने टी-20 वर्ल्डकप 2026 जिंकताना असाच एक भन्नाट योग पुन्हा एकदा समोर आला आहे आणि त्याचा संबंध एका राज्यातील खेळाडूंशी आहे.
News18
News18
advertisement

भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा विश्वचषकाचा गुलाल उधळला गेला, तेव्हा तेव्हा दक्षिण टोकाच्या केरळ राज्याचा एक 'दुवा' संघात असणे, हा आता एक अलौकिक योगायोग बनला आहे. 2007, 2011 आणि आता 2026 च्या विश्वविजयी गाथेत हे साम्य थक्क करणारे आहे.

भारतीय क्रिकेटच्या विश्वविजेतेपदाचा इतिहास आणि 'केरळ कनेक्शन' यांचा एक अजब योगायोग पुन्हा एकदा 2026 मध्ये पाहायला मिळाला. 2007 आणि 2011 मध्ये श्रीशांतने गाजवलेल्या मैदानानंतर, आता संजू सॅमसनने अहमदाबादमध्ये ऐतिहासिक खेळी करत केरळच्या खेळाडूचा संघात असणे भारतासाठी 'लकी चार्म' असल्याचे सिद्ध केले आहे.

advertisement

2007 चा पहिला टी-20 वर्ल्डकप: श्रीशांतची तो कॅच!

2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत जेव्हा पहिला टी-20 विश्वचषक खेळला गेला, तेव्हा भारतीय संघात केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत होता. जोहान्सबर्गच्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकचा तो ऐतिहासिक कॅच श्रीशांतनेच पकडला आणि भारत पहिल्यांदा विश्वविजेता झाला. त्यावेळी कर्णधार होते महेंद्रसिंग धोनी.

2011 चा वनडे वर्ल्डकप: वानखेडेवर श्रीशांतची एन्ट्री

advertisement

28 वर्षांनंतर भारताने जेव्हा 2011 मध्ये घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तेव्हाही श्रीशांत संघात होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, श्रीशांतला अंतिम सामन्यात (फायनलमध्ये) खेळण्याची संधी मिळाली होती. वानखेडेवर श्रीशांत संघात होता आणि भारताने श्रीलंकेला हरवून कप उंचावला. याही वेळी 'कॅप्टन कूल' धोनीच होता.

2026 चा टी-20 वर्ल्डकप: संजू सॅमसनचा 'अहमदाबाद' धमाका!

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

आता 2026 मध्ये भारताने पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे यावेळीही संघात केरळचा संजू सॅमसन महत्त्वाच्या भूमिकेत होता. संजूने 2026 च्या फायनलमध्ये 89 धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला विश्वविजेता बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला. संजूने फक्त फायनल नाही तर त्याआधी सेमीफानल आणि सुपर-8मध्ये वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात महत्त्वाची खेळी केली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
2007, 2011, 2026! भारत पुन्हा विश्वविजेता, तिसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनचे 'केरळम' कनेक्शन; अजब योगायोग पाहून व्हाल थक्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल