Weather Alert: ठाण्याचा ताप वाढला! कल्याण-डोंबिवलीत पारा पस्तीशी पार, 12 फेब्रुवारीला कसं असेल हवामान?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 12 फेब्रुवारीचं कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

काही दिवसांपासून तापमानात होणारे चढउतार हे महाराष्ट्रासाठी नवे नाहीत. मात्र येत्या काळात होणारे हवामान बदल चिंतेत भर टाकताना दिसतील. किमान तापमान स्थिर असल्याने राज्यात आता थंडी पूर्णपणे हद्दपार झाली असून पुन्हा एकदा तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून सतत चढत आहे. 12 फेब्रुवारी रोजी ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान गेल्या काही दिवसापासून स्थिर होते. गुरुवारी मात्र यात बदल होऊन मुख्यत्वे स्वच्छ, कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊन आज उकाडा जाणवेल तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअ असेल. हवामानात कोरडेपणा (कमी आर्द्रता) असेल, ज्यामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवेल.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान प्रामुख्याने कोरडे, स्वच्छ आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. बुधवारी असलेले किमान व कमाल तापमान स्थिर असून, कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उबदार, स्वच्छ आणि कोरडे असेल. किमान तापमान 21अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. दिवसा तापमान अधिक असून दुपारी उन्हाची कडक लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
5/5
बदलापूरमधील तापमान गुरुवारपासून पुन्हा स्थिर होऊन हवामान उष्ण आणि कोरडे असेल. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान 20 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण व निरभ्र राहील. कमाल तापमानात बदल न होता 38 अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: ठाण्याचा ताप वाढला! कल्याण-डोंबिवलीत पारा पस्तीशी पार, 12 फेब्रुवारीला कसं असेल हवामान?