Weather Update : कल्याण-डोंबिवलीत हवा बदलली, सोमवारी अलर्ट नवा, हवामान अपडेट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ठाणे जिल्ह्यात पुढील काही दिवसांसाठी हवामान स्वच्छ आणि स्थिर राहील. सोमवार 19 जानेवारी कल्याण डोंबिवली सह इतर भागातील हवामान नेमके कसे असणार? पाहुयात
advertisement
1/5

राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होताना दिसत आहेत. थंडीचा कडाका अनुभवल्यानंतर आता महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानासह पावसाची चिन्हे दिसत आहेत. मुंबईत थंडीची लाट आणि पावसाची शक्यता एकत्र आल्याने गारवा जाणवेल. तर ठाणे जिल्ह्यात पुढील काही दिवसांसाठी हवामान स्वच्छ आणि स्थिर राहील. सोमवार 19 जानेवारी कल्याण डोंबिवली सह इतर भागातील हवामान नेमके कसे असणार? पाहुयात
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामान स्थिर असून स्वच्छ आणि अंशतः ढगाळ, सूर्यप्रकाश राहील, किमान तापमान 19 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 33अंश सेल्सिअस राहील.दिवसा उबदार आणि रात्री थंड हवामानाचा अनुभव येईल. हवेत आर्द्रता कमी असल्याने हलकी थंडी जाणवेल.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि सुखद राहण्याची शक्यता आहे. वातावरण काही दिवसांपासून समान असून पुढील काही दिवस स्थिर राहील. किमान तापमान 18- 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29- 30 अंश सेल्सिअस असेल. ज्यामुळे दिवसा हलकी थंडी जाणवून हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ, आणि आल्हाददायक असेल. सकाळी उशिरापर्यंत हलके धुके असेल. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असून दिवसा वातावरण उबदार आणि रात्री थंडी जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये हवामान निरभ्र ते अंशतः ढगाळ असून सकाळी धुके असेल, किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. शहापूर मुरबाड हवामान स्वच्छ असून तापमान कमी झाल्याने सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल. किमान तापमान 12 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस असेल. हवामान कोरडे राहून थंडी जाणवेल, विशेषतः वातावरण बदलामुळे लहान मुले आणि वृद्धांनी काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Update : कल्याण-डोंबिवलीत हवा बदलली, सोमवारी अलर्ट नवा, हवामान अपडेट