TRENDING:

'तुम्ही मरणार आहात', रत्नागिरीत दुकानांबाहेर कुणी लावल्या अशा चिठ्ठ्या? अखेर गूढ उकललं

Last Updated:
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एका सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये सर्व दुकानांसमोर मृत्यूसंबंधी चिठ्ठ्या लावण्यात आल्या, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
advertisement
1/5
'तुम्ही मरणार आहात', रत्नागिरीत दुकानांबाहेर कुणी लावल्या अशी नोटीस? गूढ उकललं
रत्नागिरीतील खेडमधील अनिकेत शॉपिंग मॉलच्या दुकानांबाहेर मृत्यूशीसंबंधी आशय असलेल्या चिठ्ठ्या लावण्यात आल्या. एक नाही, दोन नाही तर तब्बल 25 ते 30 दुकानांबाहेर या चिठ्ठ्या सापडल्या. यातील मेसेज गावापासून शहरापर्यंत चर्चेचा विषय बनला.
advertisement
2/5
चिठ्ठीत लाल शाईने इंग्रजी अक्षरात लिहिण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या पोस्टरमध्ये म्हटलं आहे, '5 ऑक्टोबर 2024 रोजी दोन दिवसांनी तुमचा मृत्यू होईल. आयुष्य जगा.'  खाली ब्लडी मेरी असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येक दुकानासमोरील पोस्टरमध्ये लिहिलेल्या तारखा वेगवेगळ्या आहेत.
advertisement
3/5
या अजब प्रकारामुळे खेड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गुरुवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर शॉपिंग मॉलमधील व्यापारी मोठ्या प्रमाणात धास्तावले होते. यासंदर्भात खेड पोलीस ठाण्यात तक्रारी देखील देण्यात आल्या. खेड पोलिसांनी या संदर्भात डिटेक्टिव्ह ब्रांचच्या माध्यमातून शीघ्रगतीने तपास सुरू केला.
advertisement
4/5
अखेरीस या चिठ्ठ्या कुणी लावल्या हे समजलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती व्यक्ती कैद झाली. खरंतर या चिठ्ठ्या ठेवणारी लहान मुलं असल्याचं उघड झालं. लहान मुलांनी केलेला हा प्रँक लक्षात घेऊन तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली. पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून योग्य समज देऊन मुलांना समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या.
advertisement
5/5
मात्र दिवसभर मुलांनी केलेले या खोडकरपणाचा परिणाम भयंकर झाला होता. सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर अनेक व्यापारी धास्तावले देखील होते अखेरीस हे लहान मुलांनी केलेला खोडकरपणा असल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
'तुम्ही मरणार आहात', रत्नागिरीत दुकानांबाहेर कुणी लावल्या अशा चिठ्ठ्या? अखेर गूढ उकललं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल