Raigad : महाबळेश्वरहून महाडला गेले, सावित्री नदीत पोहताना बुडाले; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
महाबळेश्वरमधील तिघांचा महाड इथं सावित्री नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
advertisement
1/5

महाबळेश्वरहून महाडला फिरायला गेलेल्या तिघांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.
advertisement
2/5
सावित्री नदीत पोहायला उतरल्यानंतर तिघांनाही अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
advertisement
3/5
बुडून मृत्यू झालेल्यांची नावे दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद आणि जाहिद पटेल अशी आहेत.
advertisement
4/5
महाबळेश्वर गवळी मोहल्ला येथुन सव येथील दर्ग्यात ते दर्शनासाठी आले असल्याची माहिती समोर आलीय.
advertisement
5/5
एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Raigad : महाबळेश्वरहून महाडला गेले, सावित्री नदीत पोहताना बुडाले; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू