TRENDING:

Weather Alert: अवकाळी संकटानंतर धोका वाढला, महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट, 48 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावरचं अवकाळी संकट काही प्रमाणात कमी झालं आहे. मात्र, हवामान विभागाने पुन्हा महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: अवकाळी संकटानंतर धोका वाढला, महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट, 48 तासांसाठी अलर्ट
महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी संकट घोंघावत आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह गारपिटीचं संकट देखील कायम आहे. मात्र, 21 मार्चला हवामानात पुन्हा काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान, तर काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वादळी स्थितीचा अंदाज आहे. कोकण ते विदर्भ शनिवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबईसह कोकणात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. अवकाळी संकट टळलं असून आता हवामान उष्ण आणि कोरडे राहील. तर 22 मार्चपासून उन्हाची तीव्रता वाढणार असून उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट असणार आहे. शनिवारी तापमानाचा पारा 28 ते 34 अंश सेल्सिअसच्य दरम्यान राहील.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील हवामानात देखील शनिवारी बदल जाणवतील. पुणे आणि साताऱ्यात अवकाळी पावसाची शक्यता नाही. हवामान कोरडं राहील. तर कोल्हापूर, सांगली आणि सोलापुरात सोसाट्याच्या वारा आणि विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोलापुरात 48 तासानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तापमान 38 अंशांपर्यंत जाईल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हवापालट झाली आहे. अवकाळी पावसाचं संकट ओसरलं असून उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 28 ते 36 अंशांपर्यंत नोंदवले जाईल. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील शनिवारी हवापालट झाल्याचे चित्र आहे. पुन्हा उन्हाची तीव्रता वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मात्र वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. याठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
6/7
विदर्भात अवकाळी संकट कायम असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नागपूरसह विदर्भात 32-40 अंशांच्या दरम्यान कमाल तापमान राहील. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, या जिल्ह्यांना यलो अलर्ट कायम आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात 19-20 मार्चला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपीटचा अलर्ट होता. 21 मार्चला पाऊस कमी होऊन बहुतेक भागात हवामान कोरडे राहील. परंतु, विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटचा धोका कायम आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: अवकाळी संकटानंतर धोका वाढला, महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट, 48 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल