Bailgada Sharyat: 40 बैलगाड्या, लाखोंची बक्षीसं आणि शर्यतीचा थरार, हराळवाडीचं मैदान कुणी मारलं?
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Bailgada Sharyat: या स्पर्धेत सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे तसेच कर्नाटक येथून मोठ्या संख्येने हौशी बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.
advertisement
1/7

महाराष्ट्रात यात्रा उत्सव म्हटलं की कुस्ती, बैलगाडी शर्यतीचा थरार असतोच. सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी (ता. मोहोळ) येथे ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेत पारंपरिक बैलगाडा शर्यतींचा थरार यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. या शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीसह सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
2/7
“गुरु रेवणसिद्ध महाराज की जय” अशा जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पंचकमिटीच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे तसेच कर्नाटक येथून मोठ्या संख्येने हौशी बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.
advertisement
3/7
जनरल ब, चौसा, नवतर, निस नवतर आणि गावठी अशा पाच गटांमध्ये शर्यती घेण्यात आल्या. जनरल ब गटात केशव शेळके (हराळवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावत 31 हजारांचे बक्षीस मिळवले. विजय गावडे (घेरडी) यांनी द्वितीय, तर निशांत पाटील (हराळवाडी) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
advertisement
4/7
चौसा गटात प्रशांत गायकवाड प्रथम, बापू गरंडे (नंदेश्वर) द्वितीय आणि आप्पा झिंजे (पडळकरवाडी) तृतीय ठरले.नवतर गटात सिद्धू बंडगर (गोणेवाडी) प्रथम, वसंत गरंडे (नंदेश्वर) द्वितीय, तर सुरेश यमगर (घेरडी) तृतीय आले.
advertisement
5/7
निस नवतर गटात बाबा चव्हाण यांनी बाजी मारली, तर पिंटू हराळे आणि रोहित शेळके यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळवले.
advertisement
6/7
गावठी गटात रामचंद शेळके प्रथम, केशव शेळके द्वितीय आणि बिराप्पा हराळे तृतीय ठरले.
advertisement
7/7
या स्पर्धेत सुमारे 40 बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
Bailgada Sharyat: 40 बैलगाड्या, लाखोंची बक्षीसं आणि शर्यतीचा थरार, हराळवाडीचं मैदान कुणी मारलं?