10-12 तास मेकअप, खायलाही मिळत नव्हतं; घोटभर पाण्यावर करायचा शूटिंग, Dhurandhar 2 चा 'बडे साहब' बनण्यासाठी दानिशचा खतरनाक स्ट्रगल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Danish Iqbal Bade Sahab : Dhurandhar 2 च्या बडे साहबची सध्या खूप चर्चा होत आहे. पण बडे साहबची भूमिका साकारणं अभिनेता दानिश इकबालसाठी खूप मोठं चॅलेंज होतं. 'बडे साहब' बनण्यासाठी दानिशला खतरनाक स्ट्रगल करावा लागला.
advertisement
1/7

रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' या सिनेमा रिलीज होताच मोठा विक्रम रचला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात अंदाजे 241 कोटी रुपयांची कमाई केली ज्यामुळे तो बॉलिवूडमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता सर्वांचे लक्ष त्याच्या भविष्यातील कमाईवर लागले आहे.
advertisement
2/7
चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या दानिश इक्बालचेही कौतुक होत आहे. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर खोलवर छाप सोडली आहे. दानिशने सिनेमा बडे साहब म्हणजेच दाऊदची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण त्याच्या खूप चॅलेंजिंग होतं. या भूमिकेसाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. पात्राची मानसिक आणि शारीरिक स्थिती समजून घेण्यासाठी त्याने सखोल रिसर्च केला. कोणत्याही खऱ्या व्यक्तीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही.
advertisement
3/7
धुरंधर 2 चा बडे साहब साकारून अभिनेता दानिशचं खाणं-पिणं बंद झालं होतं. News18 शी बोलताना अभिनेता दानिशने सांगितलं, "हा अभिनेता बडे साहब करणार आहे तो अभिनेता करणार आहे अशा अनेक चर्चा होत्या. पण प्रेक्षकांनी जेव्हा मला बडे साहब करताना पाहिले तेव्हा ते सगळं विसरले. त्यांना ते कॅरेक्टर ती भूमिका दिसत होती. त्या भूमिकेसाठी खूप कौतुक मिळतंय. अभिनेत्यापेक्षा ती भूमिका दिसणं खूप महत्त्वाचं आहे."
advertisement
4/7
"मेकअपची खूप मोठी प्रोसेस होती. 10-12 तासांचा मेकअप होता. मेकअप झाल्यानंतर मी पहिल्यांदा स्वत:ला आरशात पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की मी खरंच आजारी आहे, मला हे सगळे आजार झालेत."
advertisement
5/7
अभिनेता दानिशने पुढे सांगितलं, "बडे साहबचा प्रोस्थेटिक मेकअप करण्यासाठी 10-12 तास लागायचे. त्यानंतर तो मेकअप काढण्यासाठी तीन चार तास लागायचे. प्रोस्थेटिक मेअकप करताना खूप रेस्ट्रिक्शन्स येतात. मेकअप केल्यानंतर काही खाऊ शकत नाही. फक्त घोटभर पाणी मिळायचं."
advertisement
6/7
"मी जेव्हा त्या बेडवर झोपले, सीन सुरू झाला तेव्हा अंगावर काटा यावा अशी परिस्थिती निर्माण झाली. माझं वय त्यांच्या जवळपासही नाहीये. पण जो माणूस इतका आजारी आहे तो काय फिल करत असेल."
advertisement
7/7
दानिशने बडे साहबच्या डायलॉगविषयी सांगितलं. तो म्हणाला, "त्याचे डायलॉग आणि तिथे जे काही दाखवण्यात आलं आहे ते अंगावर रोमांच आणणारं आहे. कारण आम्ही सगळं मनातून देशभक्त आहोत. पण ती व्यक्तिरेखा जे बोलतेय ते सगळं बॅलेन्स करण्यासाठी मला खूप वेळ लागला. माझी वैयक्तिक मतं आणि त्या व्यक्तिरेखीची मत कशी वेगळी ठेवली जाऊ शकतात यावर मला काम करावं लागलं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
10-12 तास मेकअप, खायलाही मिळत नव्हतं; घोटभर पाण्यावर करायचा शूटिंग, Dhurandhar 2 चा 'बडे साहब' बनण्यासाठी दानिशचा खतरनाक स्ट्रगल