TRENDING:

Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर राडा! आता पार्ट 3 ही येणार? राकेश बेदींनी दिली मोठी अपडेट

Last Updated:
Dhurandhar 3 Update: 'धुरंधर 2' च्या यशानंतर आता प्रेक्षकांना एकाच गोष्टीची उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे या फिल्मचा तिसरा भाग कधी रिलीज होणार? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
1/9
Dhurandhar चा पार्ट 3 ही येणार? राकेश बेदींनी दिली मोठी अपडेट
सध्या जिकडे बघावं तिकडे फक्त एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे धुरंधर २. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर राडा केला असून अवघ्या पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
2/9
पेड प्रिव्ह्यू आणि पहिल्या दिवसाचं एकत्रित कलेक्शन हे १४५ कोटी इतके झाले असून या फिल्मने बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले आहेत.
advertisement
3/9
पहिल्या दिवशी १०० कोटींचा गल्ला जमवणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. तुफान गल्ला जमवत या फिल्मने 'जवान', 'पठाण' आणि 'ॲनिमल' सारख्या सुपरहिट फिल्म्सना धुळ चारली आहे.
advertisement
4/9
चित्रपटाच्या या यशानंतर आता प्रेक्षकांना एकाच गोष्टीची उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे या फिल्मचा तिसरा भाग कधी रिलीज होणार? दरम्यान, या चित्रपटात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी फिल्मच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
advertisement
5/9
चित्रपटात पाकिस्तानी राजकारणी 'जमील जमाली' यांची भूमिका राकेश बेदी यांनी साकारली आहे. अशातच 'धुरंधर ३' बद्दल त्यांनी जे काही सांगितलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
advertisement
6/9
जेव्हा राकेश बेदींना विचारलं गेलं की, प्रेक्षकांनी आता तिसऱ्या भागाची वाट पाहायची का? तेव्हा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिलं.
advertisement
7/9
ते म्हणाले, "सध्यातरी ऑन पेपर असं काहीही ठरलेलं नाहीये. चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून नक्कीच उत्साह आहे, पण जर तिसरा भाग येणार असेल, तर त्याला अजून खूप वेळ लागेल. घाईघाईत काहीही होणार नाही."
advertisement
8/9
राकेश बेदींच्या या उत्तराने हे स्पष्ट झालंय की, निर्मात्यांच्या डोक्यात चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल विचार नक्कीच असू शकतो, पण अद्याप त्याबद्दल कोणतेही काम सुरू झालेलं नाही.
advertisement
9/9
आदित्य धर हे त्यांच्या ऑन पॉईंट कामासाठी ओळखले जातात, त्यामुळे ते 'धुरंधर ३' साठी एक तगडी कथा तयार केल्याशिवाय कोणतीही अधिकृत घोषणा करणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर राडा! आता पार्ट 3 ही येणार? राकेश बेदींनी दिली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल