'मला यशाची नशा चढली होती', ना घटस्फोट, ना सोबत; पतीपासून 36 वर्ष लांब राहतेय सुपरस्टार गायिका
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
करिअरच्या पीकवर असताना अलका याग्निक प्रेमात पडल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रियकराशी लग्नही केलं. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं, हे त्यांना आणि त्यांच्या पतीला माहीतच नव्हतं.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये अशा अनेक गायिका आहेत, ज्यांनी त्यांच्या आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केलं. अशीच एक गोड गळ्याची गायिका म्हणजे अलका याग्निक. ६० वर्षीय अभिनेत्रीने बॉलिवूडला अनेक गाणी दिली, मात्र त्यांचं खासगी आयुष्य एका फिल्मच्या कथेपेक्षा कमी नव्हतं.
advertisement
2/8
करिअरच्या पीकवर असताना अलका याग्निक प्रेमात पडल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रियकराशी लग्नही केलं. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं, हे त्यांना आणि त्यांच्या पतीला माहीतच नव्हतं.
advertisement
3/8
अलका याग्निक आणि त्यांचे पती नीरज कपूर यांची लव्हस्टोरी एका रेल्वे प्रवासादरम्यान सुरू झाली. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी १९८९ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नानंतरचं त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं.
advertisement
4/8
ज्यावेळी अलका यांनी लग्न केलं, तेव्हा त्या मुंबईमध्ये त्यांचं करिअर घडवत होत्या. याचदरम्यान नीरज यांचा व्यवसाय शिलाँगमध्ये वाढत होता. करिअरच्या पीकवर असताना अलका यांना मुंबई सोडणं शक्य नव्हतं, तर नीरज यांना त्यांचा व्यवसाय सोडून मुंबईत येणं जमण्यासारखं नव्हतं.
advertisement
5/8
अशा परिस्थितीत या जोडप्याने एक धाडसी निर्णय घेतला. गेल्या ३६ वर्षांपासून हे जोडपं वेगळ्या शहरात राहत आहेत. त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही आणि ते एकत्रही राहत नाहीत. दोघांनीही आपल्या प्रेमाबरोबरच एकमेकांच्या कामाला प्राधान्य देत हा निर्णय घेतला.
advertisement
6/8
आपल्या या आगळ्यावेगळ्या संसाराबद्दल अलका यांनी मोकळेपणाने भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "लग्नानंतर अवघ्या एका वर्षात आमच्या मुलीचा जन्म झाला. त्यावेळी 'एक दोन तीन' हे गाणं सुपरहिट झालं होतं. गाणं हिट होताच माझ्यावर यशाची नशा चढली. मी इतकी बिझी झाले की मला संसाराकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही."
advertisement
7/8
महिनाभरासाठी त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा कामामुळे त्यांना वेगळं व्हावं लागलं. नीरज कपूर थट्टेने अलका यांना म्हणतात, "अलका, तू तुझ्या करिअरसाठी लकी आहेस, पण माझ्यासाठी अनलकी." अलकाजींच्या मते, हे नातं टिकवण्यासाठी दोघांनीही खूप कष्ट घेतले आहेत.
advertisement
8/8
दरम्यान, ६० वर्षीय अलका गेल्या काही काळापासून दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस झाल्याचं निदान झालं होतं. एका विमान प्रवासानंतर त्यांना अचानक ऐकू येणं बंद झालं होतं. या कठीण काळात त्यांचे पती नीरज आणि मुलगी सायेशा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला यशाची नशा चढली होती', ना घटस्फोट, ना सोबत; पतीपासून 36 वर्ष लांब राहतेय सुपरस्टार गायिका