घरामध्ये मंदिर, मुंबईत असूनही कोल्हापुरी साज... झहीर-सागरिकाच्या घराचे Inside Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी मुंबईमध्ये कोल्हापूरची आठवण करून देईल, असं घर बांधलं आहे. या दोघांनीही त्यांच्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
advertisement
1/6

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचं मुंबईमध्ये आलिशान घर आहे. या दोघांसाठी हे फक्त घरच नाही तर कुटुंबाचा वारसा आणि आठवणींचा ठेवा आहे. सागरिकाने नुकतेच तिच्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
2/6
झहीर आणि सागरिका यांनी त्यांच्या घराला मॉर्डन इंटिरियरऐवजी त्यांच्या भावना आणि वैयक्तिक आवडीनिवडींनी सजवलं आहे. झहीर आणि सागरिकाचं हे घर पारंपारिक डिझाईन आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे.
advertisement
3/6
2025 साली झहीर आणि सागरिका यांना मुलगा झाला. या दोघांनी मुलाचं नाव फतेहसिंग खान ठेवलं. मुलाच्या स्वागतानंतर दोघांनीही त्यांचं घर कोल्हापूर आणि मुंबईच्या लाईफस्टाईल थीमने सजवलं. मुंबईचं घर मुद्दाम कोल्हापूरच्या घरासारखं डिझाईन केल्याचं सागरिका म्हणाली.
advertisement
4/6
झहीर आणि सागरिका यांच्या घरात सागाच्या लाकडाची हाताने बनवलेली कपाट आहेत. घरातील फर्निचर, कलाकृती आणि सजावटीचं सामान निवडताना दोघांनीही अजिबात घाई केली नाही.
advertisement
5/6
क्रिस्टल झुंबर आणि चांदीच्या फुलदाणीसारख्या महागड्या वस्तूंसोबतच दोघांच्या घरामध्ये एक सुंदर मंदिरही आहे. बेडरूमला शांत आणि आरामदायी बनवण्यासाठी गडद रंगाचा वापर करण्यात आला आहे. तसंच सागाच्या लाकडाचा बेड आणि पक्ष्यांची पेंटिंग्जही आहेत.
advertisement
6/6
झहीर आणि सागरिकाच्या घरामध्ये एक खास रूमही आहे, ज्याच्या भिंतींचा रंग निळा आहे. या रूमला दोघांनी मेमरी वॉल नाव दिलं आहे, जिथे झहीर आणि सागरिका यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे फोटो फ्रेम करून लावण्यात आले आहेत. काचेच्या पॅनलचे सागाचे दरवाजे घरातल्या या भागाला वेगळे आणि खास बनवतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
घरामध्ये मंदिर, मुंबईत असूनही कोल्हापुरी साज... झहीर-सागरिकाच्या घराचे Inside Photo