New Year Resolutions: नवीन वर्षासाठी करा ‘हे’ संकल्प, व्यक्तीमत्व विकासासह होतील अनेक फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
New Year 2025 Resolutions in Marathi: वर्षाचा शेवट जवळ येऊ लागला की, आपण सुरू असलेल्या वर्षात काय कमावलं काय गमावलं याचा विचार करतो. याशिवाय जे या वर्षात करणं शक्य झालं नाही ते नवीन वर्षात करण्याचा संकल्प आपण करतो. अनेक जण संकल्पाला स्वप्नपूर्तीच्या दिशेने नेतात तर काही जणांसाठी संकल्प हा एका दिवसासाठी किंबहुना काही तासांसाठीच टिकतो. मात्र आम्ही तुम्हाला आता असे काही सोपे संकल्प सांगणार आहोत, जे तुम्ही पूर्ण करू शकता आणि हे संकल्प पूर्ण केल्याचा फायदा फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला सुद्धा होऊन ते आनंदी राहू शकतात. जाणून घेऊयात 7 सोपे संकल्प.
advertisement
1/7

वर्षांच्या शेवटी अनेक जण संकल्प करतात की, ते पुढच्या वर्षी जीमला जाणार आणि स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणार. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे. त्यामुळे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून किमान 20 मिनिटांचा वेळ व्यायामासाठी राखून ठेवा. जो तुम्हाला फिट ठेवण्यासाठी मदत करेल.
advertisement
2/7
प्रत्येक जण शारीरिक व्याधींकडे लक्ष देतो किंवा त्यावर उपचार घेतो. उदा. सर्दी, ताप आला की आपण औषधं घेतो. मात्र तुमच्या मेंदूचं काय. मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. मात्र दुर्देवाने आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्ष हे मेंदूच्या आजाराकडे होतं. त्यामुळे तुम्ही तणावाचा सामना करत असाल तर मानसोपचार तज्ज्ञ किंवा मनोविकार तज्ज्ञांकडून जाणून आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या.
advertisement
3/7
वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी म्हणतो. वाचल्याने ज्ञानात भर पडते. त्यामुळे नवीन वर्षात रोज काही ना काही तरी वाचण्याची सवय लावा ज्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल
advertisement
4/7
सततच्या मोबाईल बघण्यामुळे अनेकांच्या डोळ्यावर आणि मेंदूवर ताण येऊ लागलाय. मोबाईलच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाण आपण सहन करतो आहोत. ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा कंम्प्युटरवर काम करणं हे आलंच. मात्र घरी आल्यावर पुन्हा मोबाईल पाहणं टाळा. जेणेकरून तुमचा स्क्रिन टाईम कमी होईल.
advertisement
5/7
मोबाईलच्या स्क्रिनटाईम मधून वाचलेला वेळ आपल्या प्रियजनांशी गप्पा मारण्यात घालवा. तुमच्या परिवातल्या सदस्यांशी गप्पा मारा. आठवड्यातून एकदा तुमच्या मित्र परिवाराला भेटा. यामुळे तुमचं सोशल लाईफही सुधारेल.
advertisement
6/7
भारतात अनेकांना वेळ पाळण्याची सवय नाहीये. यामुळे तुमचं तर नुकसान होतंच मात्र त्या बरोबरच समोरच्या व्यक्तीला सुद्धा ताटकळत बसावं लागतं. IST म्हणजे इंडियन स्टंडर्ड टाईम असं आपण अनेकदा मजेत म्हणतो. मात्र असं करणं टाळा. स्वत:ला वक्तशीरपणाची सवय लावून घ्या.
advertisement
7/7
आपल्यातला प्रत्येक जण हा कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी पती आणि कोणाचा तरी पिता असतो. महिलांना तर यापेक्षा कितीतरी अधिक नाती निभवावी लागतात. तुम्ही जे नातं निभवण्याचा प्रयत्न करणार आहात त्याला 100 टक्के न्याय देण्यासाठी आधी तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनावं लागेल. त्यामुळे नवीन वर्षात तुमच्यातली नकारात्मकता, वाईट सवयी सोडून द्या आणि एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
New Year Resolutions: नवीन वर्षासाठी करा ‘हे’ संकल्प, व्यक्तीमत्व विकासासह होतील अनेक फायदे