TRENDING:

IND vs ENG FINAL : आयुश म्हात्रेच्या टीमने वर्ल्ड कप जिंकला, पण बक्षीस स्वरूपात एकही रूपया मिळणार नाही, नेमकं कारण काय?

Last Updated:
झिम्बाबेच्या हरारे स्पोर्टस क्लबच्या मैदानात पार पडलेल्या आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनल सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे.
advertisement
1/8
आयुश म्हात्रेच्या टीमने वर्ल्ड कप जिंकला, पण बक्षीस स्वरूपात एकही रूपया मिळणार न
झिम्बाबेच्या हरारे स्पोर्टस क्लबच्या मैदानात पार पडलेल्या आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनल सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे.
advertisement
2/8
आयुश म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.त्यामुळे भारताच्या या विजयानंतर खेळाडूंच सध्या सर्व स्तरावरून कौतुक होतं आहे. दरम्यान या विजयानंतर भारताला बक्षीस स्वरूपात किती रक्कम मिळणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/8
खरं तर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खेळाडूंना करोडो रूपये मिळतात.त्यामुळे ज्यूनिअर टीम इंडियाला किती पैसे मिळतील याची उत्सुकता आहे. पण तुम्हाला हे ऐकूण धक्का बसेल, आयसीसीकडून वर्ल्डकप विजयानंतर भारतीय खेळाडूंना एकही रूपया मिळणार नाही आहे. यामागचं कारण काय आहेत? ती देखील जाणून घेऊयात.
advertisement
4/8
आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपसाठी कोणतीही अधिकृत बक्षीस रक्कम जाहीर करत नाही. पण सिनिअर टीम्सना वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोट्यवधी रुपये मिळतात, तर कनिष्ठ स्तरावर आयसीसी कोणतीही बक्षीस रक्कम देत नाही.
advertisement
5/8
खरं तर आयसीसी अंडर19 क्रिकेटला "विकासात्मक स्पर्धा" मानते. तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना भविष्यातील स्टार म्हणून वाढवणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. आणि खेळाची शुद्धता राखण्यासाठी आणि त्याचे पूर्णपणे व्यावसायिकीकरण होण्यापासून रोखण्यासाठी, आयसीसी या स्तरावर रोख बक्षिसे देत नाही.
advertisement
6/8
पण जरी खेळाडूंना रोख बक्षीस रक्कम मिळत नसली तरी विजेता संघ रिकाम्या हाताने परतत नाही. विजेत्या संघाला प्रतिष्ठित आयसीसी अंडर 19 ट्रॉफी दिली जाते. सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना सुवर्ण आणि रौप्य पदके देखील दिली जातात. त्याच वेळी, या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएल आणि वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळण्यास थेट पात्रता मिळते, ज्यामुळे उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात.
advertisement
7/8
आयसीसीने जरी बक्षीस दिली नसती तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या खेळाडूंना पैशांचा वर्षाव करू शकते. बीसीसीआयने यापूर्वी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघांना बक्षीस दिले आहेत.
advertisement
8/8
2022 मध्ये जेव्हा टीम इंडियाने विजेतेपद जिंकले तेव्हा बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूसाठी 40 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफसाठी 25 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG FINAL : आयुश म्हात्रेच्या टीमने वर्ल्ड कप जिंकला, पण बक्षीस स्वरूपात एकही रूपया मिळणार नाही, नेमकं कारण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल