TRENDING:

ऐश्वर्या ते आलिया! सेलिब्रिटीही आपल्या मुलांना गावंडळ म्हटल्या जाणाऱ्या पद्धतीत कडेवर का घेतात? डॉक्टरांनी सांगितला याचा फायदा

Last Updated:
Why Celebrity Carrying Baby On Hips : मुलांना कडेवर घेणं म्हणजे मुलांना पकडण्याची गावची पद्धत आहे, असं समजलं जातं. तरी सेलिब्रिटी आपल्या मुलांना याच पद्धतीने मुलांना कडेवर घेतात, ते उगाच नाही, तर यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत, त्याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
advertisement
1/5
सगळे गावची पद्धत म्हणतात, तरी सेलिब्रिटीही आपल्या मुलांना असं कडेवर का घेतात?
तुम्ही पाहिलं असेल बहुतेक सामान्य किंवा गावाकडील बायका आपल्या मुलांना एका कडेवर घेतात. सामान्यपणे मुलांना कडेवर घेण्याची ही पद्धत गावठी असल्याचं कित्येक जण म्हणतात.
advertisement
2/5
तुम्हीही तुमच्या मुलांना कधी असं कडेवर घेतलं की काय गावठीसारखं घेतलं आहे, असं कित्येक जण म्हणतात. पण तुम्ही पाहिलं असेल की सेलिब्रिटीही आपल्या मुलांना अशाच पद्धतीने उचलतात. अगदी प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि आलिया भट्टलाही तुम्ही त्यांच्या मुलांना अशाच पद्धतीने कडेवर घेतलेलं पाहिलं असेल.
advertisement
3/5
अशा पद्धतीने मुलांना पकडणं पालकांसाठी सोयीस्कर असतं. कारण त्यांचे हात मोकळे राहतात, मुलांना घेऊन इतर गोष्टी करणं सोपं होतं.
advertisement
4/5
पण याचा फायदा मुलांनाही होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यामुळे मुलांचे हिप नैसर्गिक स्थिती म्हणजे M पोझिशनमध्ये राहतात. परिणाम हिप जॉईंटचा विकास चांगला होण्यास मदत होते. मुलांचे मसल्स मजबूत होता. मान, पाठीचा कणा, बॅलेन्स आणि पोश्चर मजबूत होतं. मुलं खूप गोष्टींचं निरीक्षण करतात, परस्पर संवाद साधतात, प्रतिक्रिया देतात. मुलांची लर्निंग प्रोसेस चांगली होते.
advertisement
5/5
पण मुलांना असं कडेवर घेताना त्यांची पाठ, मांड्यांना सपोर्ट द्या. पाय लटकू देऊ नका, असा सल्ला डॉ. दीप्ती पैघण यांनी दिला आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ऐश्वर्या ते आलिया! सेलिब्रिटीही आपल्या मुलांना गावंडळ म्हटल्या जाणाऱ्या पद्धतीत कडेवर का घेतात? डॉक्टरांनी सांगितला याचा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल