TRENDING:

Secret Santa : सिक्रेट सांता बनलात, काय घ्यायचं कळत नाही? तुमच्या फिमेल कलीगला द्या हे खास गिफ्ट!

Last Updated:
Secret Santa gift ideas for female colleague : ऑफिसमध्ये नाताळ जवळ आला की, एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते आणि त्यातही सीक्रेट सांता हा खेळ सगळ्यांनाच आवडतो. कोणासाठी गिफ्ट घ्यायचं आहे हे गुप्त ठेवत, कमी बजेटमध्ये सुंदर आणि उपयोगी भेटवस्तू शोधणं हीच खरी मजा असते. विशेषतः महिला सहकाऱ्यासाठी गिफ्ट घ्यायचं असेल आणि बजेट मर्यादित असेल तर थोडा विचार करावा लागतो. पण काळजी करू नका. कमी खर्चातही स्टायलिश, विचारपूर्वक आणि आवडणारी भेट देता येते. चला पाहूया सीक्रेट सांता साठी 500 रुपयांखाली महिला सहकाऱ्यांसाठी बेस्ट गिफ्ट आयडिया.
advertisement
1/9
सिक्रेट सांता बनलात, काय घ्यायचं कळत नाही? तुमच्या फिमेल कलीगला द्या 'हे' गिफ्ट!
सुगंधी मेणबत्त्या : अरोमा कँडल्स घरात किंवा ऑफिस डेस्कवर ठेवायला अतिशय छान दिसतात. लॅव्हेंडर, व्हॅनिला किंवा रोझ सुगंध असलेल्या मेणबत्त्या रिलॅक्सिंग फील देतात आणि परफेक्ट सीक्रेट सांता गिफ्ट ठरतात.
advertisement
2/9
क्युट कॉफी/टी मग : ‘Good Vibes Only’, ‘Boss Lady’ किंवा फनी कोट असलेला मग रोजच्या वापरात येतो. ऑफिसमध्ये कॉफी किंवा चहा पिण्यासाठी हा गिफ्ट नक्कीच उपयोगी आणि आवडता ठरतो.
advertisement
3/9
पर्सनलाइज्ड नोटबुक किंवा डायरी : सुंदर कव्हर असलेली छोटी डायरी किंवा नोटबुक ऑफिस नोट्ससाठी, टू-डू लिस्टसाठी खूप उपयुक्त असते. नाव किंवा मोटिवेशनल कोट असलेली डायरी अधिक खास वाटते.
advertisement
4/9
डेस्क प्लांट : लहान सुक्युलेंट किंवा इंडोअर प्लांट ऑफिस डेस्कवर ठेवायला एकदम परफेक्ट. हे गिफ्ट पॉझिटिव्हिटी वाढवतं आणि जास्त देखभालीची गरजही नसते.
advertisement
5/9
हँड क्रीम किंवा स्किन केअर मिनी किट : हिवाळ्यात हात कोरडे पडतात. त्यामुळे नॅचरल हँड क्रीम, बॉडी लोशन किंवा मिनी स्किन केअर सेट हे अतिशय उपयोगी गिफ्ट ठरते.
advertisement
6/9
स्टायलिश पेन किंवा पेन सेट : एक चांगल्या क्वालिटीचं पेन किंवा छोटा पेन सेट हा क्लासिक आणि सुरक्षित पर्याय आहे. ऑफिसमध्ये रोज वापरता येणारं गिफ्ट नेहमीच उपयोगी पडतं.
advertisement
7/9
मोबाइल स्टँड किंवा फोन अ‍ॅक्सेसरी : डेस्कवर ठेवता येणारा मोबाइल स्टँड, पॉप ग्रिप किंवा फोन होल्डर हा आजच्या डिजिटल युगात खूपच कामाचा गिफ्ट आहे.
advertisement
8/9
चॉकलेट बॉक्स किंवा स्वीट ट्रीट : चॉकलेट कोणाला आवडत नाही? डार्क चॉकलेट, असॉर्टेड चॉकलेट बॉक्स किंवा हेल्दी स्नॅक्सचा छोटा पॅक हा सीक्रेट सांता साठी नेहमीच सेफ ऑप्शन आहे.
advertisement
9/9
क्युट कीचेन किंवा टोट बॅग : फनी, स्टायलिश कीचेन किंवा हलकी फोल्डेबल टोट बॅग ही छोटी पण लक्षात राहणारी भेट ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Secret Santa : सिक्रेट सांता बनलात, काय घ्यायचं कळत नाही? तुमच्या फिमेल कलीगला द्या हे खास गिफ्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल