क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 21 वर्षीय तरुणी म्हाडा कॉलनी बाबा पंप परिसरातून बेपत्ता झाली आहे. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकलठाणा बौद्धवाड्यातून 25 वर्षीय, चिकलठाण्यातून 24 वर्षीय आणि सिडको बसस्थानक परिसरातून 22 वर्षीय अशा 3 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगरातून 18 वर्षीय मुलगी घरातून निघून गेली आहे. धक्कादायक म्हणजे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 5 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यात रांजणगाव शेणपुंजी येथून 19 वर्षे वयाच्या 2 तरुणी, कमळापूर येथून 19 वर्षीय तरुणी, पंढरपूर येथून 25 वर्षीय तरुणी, वडगाव कोल्हाटीतून 25 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.
advertisement
Valentines Day ला खिशाला कात्री, गुलाबाला सोन्याचं मोल, किती मोजावे लागणार? Video
जिल्ह्यातून 10 तरुणी बेपत्ता...
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातून 10 तरुणी या काळात बेपत्ता झाल्या आहेत. यात शनी देवगाव (पोलीस ठाणे विरगाव) येथून 23 वर्षीय तरुणी, लासूरस्टेशन (पोलीस ठाणे शिल्लेगाव) येथून 18 वर्षीय तरुणी, पिशोर येथून (पोलीस ठाणे पिशोर) 24 वर्षीय व 23 वर्षीय अशा 2 तरुणी, झाल्टा (पोलीस ठाणे चिकलठाणा) येथून 27 वर्षीय तरुणी, गंगापूर येथून 27 वर्षीय तरुणी, उपळी (पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण) येथून 24 वर्षीय तरुणी, सिसारखेडा (पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण) येथून 23 वर्षीय तरुणी, पाचोड येथून 22 वर्षीय तरुणी, वैजापूर शहरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.






