Birthday Wishes In Marathi : प्रिय आजीला द्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा, होईल मनापासून आनंदी!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
birthday wishes in marathi : तुमच्या लाडक्या आजीचा वाढदिवस साजरा करायचंय? मग आजीला वाढदिवसाच्या या गोड शुभेच्छा द्या. तिचा दिवस अगदी आनंदी होईल.
advertisement
1/12

आनंद तुझ्या आयुष्यातून कोठेही जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही येऊ नये, पुर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा, तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
2/12
खूप छान आहे माझी आजी, प्रत्येक वेळी मला हसवते, नशिबवान असतात ते लोक, ज्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखी आजी असते.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
3/12
आईवडिलांबरोबरच माझ्यावर ज्यांनी चांगले संस्कार केले ते माझे आजीआजोबा.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
4/12
आजी तू रोज देवळात जाऊन सर्वांसाठी प्रार्थना करतेस, आज तुझ्या वाढदिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
5/12
ज्या पद्धतीने आईने मला जगण्याचा योग्य मार्ग दाखवला, त्याच पद्धतीने माझ्या आजीने आमच्या संपूर्ण परिवाराला योग्य मार्ग, योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
6/12
आयुष्यात प्रत्येक क्षण सुखी असतो, येत नाहीत कधी वादळे दुःखाची, कारण संरक्षण करण्यासाठी आहे माझी लाडकी आजी.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
7/12
कधी बाबा रागवले की आपली आई वाचवते जर आई रागावली की आपली आजी वाचवते, माझी प्रेमळ आजी माझे पूर्ण जगच सजवते.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
8/12
श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगून आम्हाला लहानपणीच योग्य शिकवण दिल्याबद्दल तुमचे आभार, देव करो अशी आजी सर्वांना मिळो.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
9/12
जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो.. धन्यवाद आजी माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
10/12
आजी तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला प्रेम दया धैर्याची शिकवण मिळाली, आज मी जे काही मिळवले ते फक्त तुझ्या या शिकवणीमुळे शक्य झाले.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
11/12
ईश्वराचे खूप आभार आज साठी ओलांडली तरीही तू खूप निरोगी आहेस, माझी अशी प्रार्थना आहे की येणारे अनेक वर्षे तू अशीच निरोगी राहावीस.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
12/12
अनुभवांनी भरलेले आयुष्य, चालून थकते काही पावले, जवळ जाता ओळखते न पाहता, चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes In Marathi : प्रिय आजीला द्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा, होईल मनापासून आनंदी!