कांद्याच्या शेतात डुलणाऱ्या त्या 72 लाखाच्या सुंदर फुलांनी केला 'घात'; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी, प्रकरण काय?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
(बालाजी निरफळ, प्रतिनिधी) धाराशिव: जेव्हा ही झाडं मोठी झाली आणि त्यांना पांढऱ्या-गुलाबी रंगाची फुले अन् मोठी बोंडे येऊ लागली, तेव्हा स्थानिक नागरिकांना संशय आला.
advertisement
1/7

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका राजकीय पदाधिकाऱ्याने शेतीच्या नावाखाली चालवलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दशमेगाव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख समाधान उघडे यांनी चक्क कांद्याच्या पिकात अंतरपीक म्हणून अमली पदार्थ असलेल्या अफूची लागवड केली होती.
advertisement
2/7
स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून तब्बल ७२ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
3/7
समाधान उघडे यांनी अत्यंत चलाखीने कांदा पिकात अफूची विनापरवाना लागवड केली होती. मात्र, जेव्हा ही झाडं मोठी झाली आणि त्यांना पांढऱ्या-गुलाबी रंगाची फुले अन् मोठी बोंडे येऊ लागली, तेव्हा स्थानिक नागरिकांना संशय आला.
advertisement
4/7
ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता, शेतात ४८५.६५ किलो वजनाची अफूची झाडे डौलाने डुलताना आढळली.
advertisement
5/7
या कारवाईचे पडसाद थेट राजकीय वर्तुळात उमटले. अमली पदार्थांच्या शेतीत पदाधिकाऱ्याचे नाव समोर येताच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कठोर भूमिका घेतली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समाधान उघडे यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी केली आहे.
advertisement
6/7
"पक्षाच्या भूमिकेला बाधा आणणारे आणि शिस्तभंग करणारे कृत्य खपवून घेतले जाणार नाही," असे स्पष्ट करत खासदारांनी कारवाईचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
advertisement
7/7
या कारवाईत एकूण ७२ लाख ८४ हजार ७५० रुपयांची ४ क्विंटलहून अधिक अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत. समाधान उघडे यांच्यावर विनापरवाना अमली पदार्थांची लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
कांद्याच्या शेतात डुलणाऱ्या त्या 72 लाखाच्या सुंदर फुलांनी केला 'घात'; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी, प्रकरण काय?