कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग एकेरी आहे. त्यामुळे नव्या गाड्या कोल्हापुरातून सुरू करणे तसेच रेल्वे गाड्यांचे क्रॉसिंग याला मर्यादा येतात. कोल्हापूर ते मिरज या 47 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण व्हावे, ही कोल्हापूरकरांची प्रदीर्घकाळची मागणी आहे. आता रेल्वे मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून 964 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.
advertisement
विज बिलाचं टेन्शन नाही, शुन्य खर्चात चालणारा AC, चिमुरड्या पोरीची भन्नाट आयडिया PHOTOS
असे होतील फायदे
निधी मंजूर झाल्यामुळे कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. सुमारे 47 किलोमीटरच्या या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यावर लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या कोल्हापुरातून सुरू होऊ शकतील. शिवाय "वंदे भारत'सारख्या नव्या आलिशान रेल्वे गाड्या देखील कोल्हापूरला मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही महाडिक यांनी सांगितले.






