Birthday Wishes For Ajji : प्रिय आज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझे स्मितहास्य असेच खुलत राहो..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Ajji In Marathi : आजी, जी आपल्याला लहानपणी गोष्टी सांगते, जागच्या वागण्याच्या पद्धतीला शिकवते. त्या आजीचा वाढदिवस आपल्यासाठी निश्चितच खास असतो. अशा प्रसंगी तुमच्या आजीला आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे काही शुभेच्छा संदेश.
advertisement
1/7

अनुभवांनी भरलेले आयुष्य, चालून थकते काही पावले, जवळ जाता ओळखते न पाहता, चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
2/7
ईश्वराचे खूप आभार आज साठी ओलांडली तरीही तू खूप निरोगी आहेस, माझी अशी प्रार्थना आहे की येणारे अनेक वर्षे तू अशीच निरोगी राहावीस.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
3/7
आजी तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला प्रेम दया धैर्याची शिकवण मिळाली, आज मी जे काही मिळवले ते फक्त तुझ्या या शिकवणीमुळे शक्य झाले.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
4/7
जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो.. धन्यवाद आजी माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
5/7
श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगून आम्हाला लहानपणीच योग्य शिकवण दिल्याबद्दल तुमचे आभार, देव करो अशी आजी सर्वांना मिळो.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
6/7
कधी बाबा रागवले की आपली आई वाचवते जर आई रागावली की आपली आजी वाचवते, माझी प्रेमळ आजी माझे पूर्ण जगच सजवते.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
advertisement
7/7
आयुष्यात प्रत्येक क्षण सुखी असतो, येत नाहीत कधी वादळे दुःखाची, कारण संरक्षण करण्यासाठी आहे माझी लाडकी आजी.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज्जी..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Ajji : प्रिय आज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझे स्मितहास्य असेच खुलत राहो..