TRENDING:

Boiled Egg Storage Tips : उकडलेली अंडी किती दिवस चांगली राहतात? खराब झाल्याची 'ही' चिन्हं त्वरित ओळखा..

Last Updated:
अंडी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यात असलेले प्रोटीन आणि इतर पोषख तत्व शरीराच्या अनेक गरजा भागवतात. अंडी अनेक पद्धतीने खाल्ली जाऊ शकतात. परंतु बरेज जण ती उकडून खाणं पसंत करतात. उकडलेल्या अंड्यांना तेल नसतं आणि ती बनवायलाही फार मेहनत लागत नाही.
advertisement
1/7
उकडलेली अंडी किती दिवस चांगली राहतात? खराब झाल्याची 'ही' चिन्हं त्वरित ओळखा..
अंडी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यात असलेले प्रोटीन आणि इतर पोषख तत्व शरीराच्या अनेक गरजा भागवतात. अंडी अनेक पद्धतीने खाल्ली जाऊ शकतात. परंतु बरेज जण ती उकडून खाणं पसंत करतात. उकडलेल्या अंड्यांना तेल नसतं आणि ती बनवायलाही फार मेहनत लागत नाही.
advertisement
2/7
अंडी उकडायला थोडा वेळ नक्की लागतो. त्यामुळं अनेकजण एकाच वेळील अनेक अंडी उकडून ते साठवून ठेवतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खातात. प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी अंडी हा एक अतिशय लोकप्रिय खाद्यप्रकार बनला आहे. अंड्यांमुळं पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही.
advertisement
3/7
शिवाय त्यातील पोषक घटक शरीराच्या गरजा पूर्ण करतात. परंतु साठवलेली अंडी खराब होऊ शकतात. त्यामुळं उकडलेली अंडी किती दिवस खां योग्य आहे, असा प्रश्न कधी तुमच्याही मनात आला असेल. कारण जास्त काळ साठवून ठेवलेली अंडी खराब होऊ शकतात आणि त्यामुळं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
advertisement
4/7
एबीपीने दिलेल्या वृत्तात अमेरिकेच्या आरोग्य संस्था CDC आणि USDA यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वेळेअभावी अनेक जण अंडी उकडून ती फ्रिजमध्ये किंवा स्वयंपाकघरातील डब्यात साठवून ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी साधारणपणे 5 ते 7 दिवस टिकतात. तुलनेने डब्यातील अंडी लवकर खराब होऊ शकतात. कारण अंडी उकडल्यानंतर जास्त वेळ रुम टेंम्परेचरवर ठेवू नयेत. यामुळं जिवाणूंची वेगाने वाढ होण्याची शक्यता असते.
advertisement
5/7
उकडलेली अंडी खायला जितकी सोपी असतात तितकीच ती सुरक्षित ठेवणं देखील गरजेचं असतं. तुम्ही उकडलेली अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असाल, तर ती 4-5 दिवसांच्या आत खाऊन टाका. तसेच ती साठवताना योग्य ती काळजी घ्या आणि अंडी खराब झाल्याचे थोडे देखील चिन्हं दिसल्यास ते खाणं टाळा. कारण त्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
advertisement
6/7
अंडी योग्य प्रकारे साठवणं देखील गरजेचं असतं. अंडी उकडल्यानंतर दोन तासांच्या आत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. उकडलेली अंडी साठवताना सोलू नका; यामुळं ती जास्त काळ ताजी राहतात. रेफ्रिजरेटरचे तापमान 4°C किंवा त्यापेक्षा कमी असावं हे लक्षात ठेवा. शक्यतो अंडी हवाबंद डब्यात ठेवा. यामुळं जीवाणूंचा प्रादुर्भाव टाळता येतो.
advertisement
7/7
खराब झालेली अंडी ओळखणं आणि ते खाणं टाळणं हे देखील महत्त्वाचं आहे. यासाठी काही लक्षणांकडे लक्ष द्या. अंड्यातून तीव्र किंवा कुजल्यासारखा वास येणे, अंड्याचे कवच चिकट दिसणे, कापल्यावर रंग किंवा पोत असामान्य दिसणे, अंड्याचे कवच अंड्याला घट्ट चिकटलेलं असणे आणि अंड्यातून पाण्यासारखा पदार्थ बाहेर येणे, असा बदल दिसल्यास ती अंडी खाणं टाळा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)खराब झालेली अंडी ओळखणं आणि ते खाणं टाळणं हे देखील महत्त्वाचं आहे. यासाठी काही लक्षणांकडे लक्ष द्या. अंड्यातून तीव्र किंवा कुजल्यासारखा वास येणे, अंड्याचे कवच चिकट दिसणे, कापल्यावर रंग किंवा पोत असामान्य दिसणे, अंड्याचे कवच अंड्याला घट्ट चिकटलेलं असणे आणि अंड्यातून पाण्यासारखा पदार्थ बाहेर येणे, असा बदल दिसल्यास ती अंडी खाणं टाळा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Boiled Egg Storage Tips : उकडलेली अंडी किती दिवस चांगली राहतात? खराब झाल्याची 'ही' चिन्हं त्वरित ओळखा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल