Budget Travel Spots : मित्रमैत्रिणींसोबत फिरायचा प्लॅन करताय? 'या' 5 ठिकाणी करू शकता बजेट फ्रेंडली प्रवास..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Budget Travel Destinations In India : कडक उन्हाळा सुरु होण्यापूर्वी बरेच लोक फिरण्याचा बेत बनवतात, तर काहींना उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरणं सोयीचं पडतं. खरं तर ज्यांना फिरायचं असतं, त्यांना कोणत्याही ऋतूने फरक पडत नाही. तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत फिरायचे प्लॅनिंग करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट ठिकाणं सांगत आहोत.
advertisement
1/7

फिरण्याची हौस असणारे लोकं कायम निमित्त आणि एखादं चांगलं ठिकाण शोधत असतात, जिथे ते फिरायला जाऊ शकतील. बरेच ठिकाणं दिसतातही फिरण्यासारखे. मात्र प्रत्येकवेळी खूप पैसे खर्च कारण सर्वांनाच शक्य होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही बजेट फ्रेंडली ठिकाणं सांगत आहोत.
advertisement
2/7
झिरो व्हॅली : झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेशातील एक ठिकाण आहे. इथले वातावरण अत्यंत शांत आणि रमणीय आहे. या ठिकाणी अनेक जागी भातशेती, पाइन जंगले आणि अपातानी जमातीची संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्हाला परवडणारे होमस्टे आणि जेवण मिळेल.
advertisement
3/7
क्लिफ बीच : गोवा हे आता परवडणाऱ्या ठिकाणांपैकी राहिलेले नाही. अशावेळी वर्कलाचा क्लिफ बीच हा समुद्रकिनाऱ्याचा एक स्वस्त पर्याय मानला जातो. इथे तुम्हाला कमी किंमतीत गेस्टहाऊस, योगा स्टे आणि स्थानिक कॅफे मिळतील. इथे सूर्यास्त पाहणे आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा अनुभव काही वेगळाच आहे.
advertisement
4/7
हंपी : ज्या लोकांना जुन्या वास्तू पाहायला आवडतात, जून आर्किटेक्चर पाहायला आवडतं त्यांनी हमीपला एकदा तरी जायलाच हवं. हंपी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळदेखील आहे. हे ठिकाण बजेट-फ्रेंडली आहे. इथे परवडणारे अतिथीगृह, कमी किंमतीत भाड्याने बाईक आणि स्थानिक नाश्ता सहज मिळतो. जुन्या इथली मंदिरं पाहायला तुम्हाला नक्की आवडतील.
advertisement
5/7
बुंदी : जयपूर, उदयपूर अशा महागड्या ठिकाणांऐवजी राजस्थानमधील बुंदी हे शहर स्वस्त आणि फिरण्यायोग्य आहे. हे लहान, शांत आणि बजेट-फ्रेंडली शहर आहे, जिथे निळ्या रंगाची घरे, पायऱ्या आणि किल्ले पाहायला मिळतात. इथे राहण्याची व्यवस्था स्वस्तात होते आणि जेवणही परवडणाऱ्या किंमतीत मिळते. इथे गर्दीदेखील कमी असते.
advertisement
6/7
माजुली : माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे. हे इथल्या संथ आणि सोप्या प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला सत्र वैष्णव मठ, ग्रामीण जीवन आणि संस्कृती पाहायला आवडेल. इथे अनेक होमस्टे परवडणारे जेवण आणि घरी बनवलेले जेवण उपलब्ध करून देतात.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Budget Travel Spots : मित्रमैत्रिणींसोबत फिरायचा प्लॅन करताय? 'या' 5 ठिकाणी करू शकता बजेट फ्रेंडली प्रवास..