TRENDING:

नवरीसाठी घ्या ट्रेंडिंग शालू, इथं स्वस्तात मिळतायेत आकर्षक व्हरायटी

Last Updated:
लग्नात नवरीच्या सुंदर आणि आकर्षक शालूच्या शोधात सर्वजण असतात. हा शोध पुण्यातील या ठिकाणी संपेल.
advertisement
1/7
नवरीसाठी घ्या ट्रेंडिंग शालू, इथं स्वस्तात मिळतायेत आकर्षक व्हरायटी
महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की, लग्नासाठी साड्यांचे प्रकार अनेक आहेत. लग्न ठरलं की, लग्नाची साडी खरेदीला सुरूवात होते. सध्या बाजारपेठेत काही शालू सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत.
advertisement
2/7
आजही अनेक लग्नांमध्ये शालू या साडीचा प्रकार नेसला जातो. अनेकांना लग्नासाठी भरजरी शालू हा प्रकार आवडतो. त्यामुळे आज आपण सध्या <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातील</a> मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये कुठले शालू आहेत हे पाहणारं आहोत.
advertisement
3/7
पुण्यातील पिंपरीचिंचवड मधील लक्ष्मी सिल्क या दुकानात तुम्हांला शालूचे अनेक प्रकार मिळतील. नववधूसाठी 2500 रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंतचे शालू या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये बालगंधर्व पैठणी, बनारसी शालू, चंदेरी, कांचिपुरम, जरतारी, उपाडा सिल्क, काठापदराची साडी, कोटा सिल्क असे प्रकार ट्रेंडिंगमध्ये आहेत.
advertisement
4/7
लग्नामध्ये मुलीकडचे लोक बस्ता बांधताना शालूची निवड करतात. गडद रंगाचा हा शालू थोडा जड असतो. त्यामुळे बऱ्यापैकी कमी खरेदी केला जातो.
advertisement
5/7
आजकाल मुलींना तितकी जड साड्या नेसायची सवय राहिलेली नाही. मात्र तरीही शालूची खरेदी लग्नाच्या वेळी करणं हे आजही तितकेच आनंददायी वाटते. यात वेगवेगळे आकर्षक रंग देखील उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
advertisement
6/7
तुम्ही साडीवर हिल्स घालणार असाल तर लक्षात ठेवा साडी नेसताना तुम्ही आधीच हिल्स घाला आणि मग साडी नेसा. यामुळे तुमची साडी पायात अडकणार नाही आणि व्यवस्थित राहील.
advertisement
7/7
तुमची साडी कितीही सुंदर असली तरीही त्याच्या निऱ्या जोपर्यंत नीट येत नाहीत तोपर्यंत ती आकर्षक दिसणार नाही. त्यामुळे साडीच्या निऱ्या काढताना योग्य लक्ष द्या. त्याच्या मिऱ्या व्यवस्थित आल्यानंतरच साडी खोचा. साडी नेसल्यानंतर त्यासह योग्य दागिन्यांची निवड करा. अन्यथा साडीचा लुक खराब होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
नवरीसाठी घ्या ट्रेंडिंग शालू, इथं स्वस्तात मिळतायेत आकर्षक व्हरायटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल