New Year 2026: नवीन वर्षाचं पुणेरी स्वागत, एफ सी रोडवरचं हटके सेलिब्रेशन, PHOTO पाहिले का?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
New Year 2026: जुन्या वर्षाच्या आठवणींना निरोप देत, नव्या आशा, अपेक्षा आणि संकल्पांसह पुणेकरांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
advertisement
1/7

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले होते. 31 डिसेंबरच्या रात्रीपासूनच शहरातील वातावरणात चैतन्य आणि आनंदाची लहर पाहायला मिळाली.
advertisement
2/7
पुण्यातील प्रमुख चौक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच खासगी कार्यक्रमांमधून नववर्ष स्वागताचा जल्लोष सुरू होता. विशेषतः तरुणाईचे आवडते ठिकाण असलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफ. सी.) रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
advertisement
3/7
एफ. सी. रोड हा पुण्यातील तरुणाईचा आवडत ठिकाण म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी येथे हजारो तरुण-तरुणी जमा झाले होते.
advertisement
4/7
रंगीबेरंगी फुगे उडवत, हॅपी न्यू इयर च्या शुभेच्छा देत, जल्लोष करत तरुणाई नववर्षाचे स्वागत करताना दिसत होती. काही जण मोबाईलमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ काढत हा क्षण टिपत होते.
advertisement
5/7
एफ. सी. रोडसह जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर अशा अनेक भागांमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, संभाव्य गर्दी आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
advertisement
6/7
एफ. सी. रोड आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. वाहतूक सुरळीत राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत पेट्रोलिंग करण्यात येत होते. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.
advertisement
7/7
नववर्षाच्या पहिल्या क्षणापासूनच पुण्यात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. जुन्या वर्षाच्या आठवणींना निरोप देत, नव्या आशा, अपेक्षा आणि संकल्पांसह पुणेकरांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
New Year 2026: नवीन वर्षाचं पुणेरी स्वागत, एफ सी रोडवरचं हटके सेलिब्रेशन, PHOTO पाहिले का?