Soyabean Market Update : सोयाबीनची आवक वाढली! पण दर स्थिर,आजचे बाजारभाव काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soyabean Market Latest Update : राज्यातील सोयाबीन बाजारात आज (१६ फेब्रुवारी)बाजार भावामध्ये चढ-उतार पाहायला मिळाले.
advertisement
1/5

मुंबई : राज्यातील सोयाबीन बाजारात आज (१६ फेब्रुवारी)बाजार भावामध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. काही बाजार समित्यांमध्ये चांगल्या दराची नोंद झाली असली, तरी आवक मर्यादित राहिल्यामुळे दरात मोठी उसळी दिसून आलेली नाही.
advertisement
2/5
नागपूर बाजारात आवक जास्त, दर स्थिर - नागपूर बाजार समितीत आज सोयाबीनची सर्वाधिक ९७० क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. लोकल प्रतिच्या सोयाबीनला किमान ४,७०० रुपये, तर कमाल ५,१६१ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. सर्वसाधारण दर ५,०२५ रुपयांवर स्थिरावला. मोठ्या प्रमाणातील आवक असूनही मागणी मध्यम राहिल्याने दरात फारसा चढ-उतार झाला नाही.
advertisement
3/5
वरूडमध्ये पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी वरूड बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची २२६ क्विंटल आवक झाली. येथे किमान दर ४,३२० रुपये, तर कमाल दर ५,१९५ रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आला. सर्वसाधारण दर ४,६९९ रुपये राहिला. दर्जेदार मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याचे चित्र दिसून आले.
advertisement
4/5
पाथरीत आवक अत्यल्प, दर मर्यादित - पाथरी बाजार समितीत आज केवळ ३ क्विंटल इतकीच आवक झाली. पिवळ्या सोयाबीनला येथे किमान आणि सर्वसाधारण दर ४,५०० रुपये मिळाला, तर कमाल दर ४,८०० रुपये प्रति क्विंटल राहिला. आवक कमी असल्याने बाजारात फारशी चढाओढ दिसून आली नाही.
advertisement
5/5
राज्यातील एकूण बाजारस्थिती - काही ठिकाणी दर ५ हजारांच्या पुढे गेले असले, तरी सर्व बाजारांत एकसमान वाढ झालेली नाही. पुढील काही दिवसांत आवक वाढल्यास दरावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Soyabean Market Update : सोयाबीनची आवक वाढली! पण दर स्थिर,आजचे बाजारभाव काय?