Bharat Taxi : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता शहरात धावणार भारत टॅक्सी, बुकिंग कसं? भाडे किती? पाहा सविस्तर
Last Updated:
Pune Bharat Taxi service news : पुण्यातील नागरिकांनो प्रवास करणाऱ्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. अन्यथा तुमचे अतिरिक्त पैसे वाया जाऊ शकतात.
advertisement
1/7

पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणने येथे भारत टॅक्सी ही नवीन आणि परवडणारी सेवा सुरू केली आहे.
advertisement
2/7
सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जात असून पुणे हे निवडक विमानतळांपैकी एक आहे. या सेवेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चित दर. गर्दीची वेळ असो किंवा रात्री उशिरा प्रवास असो भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही.
advertisement
3/7
प्रति किलोमीटर ठराविक दरानेच पैसे आकारले जातील. त्यामुळे प्रवाशांना प्रवासापूर्वीच अंदाजे खर्चाची स्पष्ट माहिती मिळेल. यामुळे भाड्यातील पारदर्शकता वाढेल आणि प्रवाशांचा विश्वासही मजबूत होईल.
advertisement
4/7
ही सेवा राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ मार्फत चालवली जाणार आहे. या योजनेत वाहनचालकच गाडीचा मालक असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांना कमिशन द्यावे लागणार नाही. संपूर्ण कमाई थेट चालक-मालकाकडे जाईल ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
सेवेसाठी सुरक्षित आणि सोपे मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. अॅपद्वारे प्रवासी सहज टॅक्सी बुक करू शकतात आणि निश्चित दराने प्रवास करू शकतात. वाढत्या भाड्यांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन 5 फेब्रुवारीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला.
advertisement
6/7
प्रायोगिक टप्प्यात ही सेवा देशातील 11 विमानतळांवर सुरू होणार आहे, त्यामध्ये राजकोट, पटना, वडोदरा, भुज, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सुरत, कानपूर, वाराणसी, आग्रा आणि प्रयागराज यांचा समावेश आहे.
advertisement
7/7
या निर्णयामुळे विमानतळ प्रवास अधिक सुरक्षित सोपा आणि किफायतशीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Bharat Taxi : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता शहरात धावणार भारत टॅक्सी, बुकिंग कसं? भाडे किती? पाहा सविस्तर