TRENDING:

Cinnamon Water Benefits: लाकडा सारखा दिसणारा ‘हा’ मसाला आहे बहुगुणी, रोज पाण्यात टाकून घेतल्यास होतील अनेक फायदे

Last Updated:
Benefits of cinnamon water in Marathi: दालचिनी हा गरम मसाल्यांचा एक प्रकार आहे. नावाप्रमाणे दालचिनी चवीला तिखट नसून गोड आहे. लाकडासारखी दिसत असल्यामुळे दालचिनीच भेसळ होण्याच प्रमाण वाढलंय. दालचिनी ही फक्त जेवणापुरता मर्यादित राहिली नसून औषधी गुणधर्मांमुळे अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी ठरते आहे.
advertisement
1/7
Cinnamon Benefits: लाकडासारख्या दिसणाऱ्या दालचिनीचे आहेत ‘इतके’ फायदे
दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दालचिनीचं पाणी प्यायल्यास त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरतं.
advertisement
2/7
दालचिनीमुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. ज्याचा थेट फायदा मेंदू आणि हृदयाला होतो. त्यामुळे दालचिनीच्या पाण्याचं सेवन केल्यामुळे हृदयविकारांचा धोका टळतो. दालचिनी हे रक्तातले ट्रायग्लिसराईड्स म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल कमी करते,त्यामुळे हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होते.
advertisement
3/7
मासिक पाळी दरम्यान महिलांनी दालचिनीचं पाणी प्यायल्या त्यांना फायदा होऊ शकतो. दालचिनीच्या पाण्यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. शिवाय या ठराविक दिवसात होणारी चिडचिड कमी होऊन मन स्थिर व्हायला मदत होते.
advertisement
4/7
जर तुम्हाला दातदुखी किंवा काही खाल्ल्यानंतर तोंडातल्या दुर्गंधीचा त्रास असेल तर त्यासाठी दालचिनीचं पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे. दालचिनीतल्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मामुळे तोंडातल्या दुर्गंधीचा त्रास कमी होऊ शकतो. दालचिनीचं तेल हे अनेक दंतविकारांना रोखतं.
advertisement
5/7
दालचिनीत असलेलं पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट आणि दालचिनीचे अँटीव्हायरल गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांशी सहज लढता येतं.
advertisement
6/7
वजन कमी करण्यात दालचिनीचं पाणी फायदेशीर आहे. यासाठी दालचिनीच्या काड्या पाण्यात टाकून ती 15-20 मिनीटे व्यवस्थित उकळून घ्या. हे पाणी थोडसं कोमट झाल्यावर तुम्ही पिऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यासोबतच पोटाचं आरोग्यही सुधारेल.
advertisement
7/7
लाकडासारखी दिसत असल्यामुळे दालचिनीच भेसळ होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे दालचिनीचा वापर करताना ती भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या. अन्यथा फायद्या ऐवजी नुकसानच होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cinnamon Water Benefits: लाकडा सारखा दिसणारा ‘हा’ मसाला आहे बहुगुणी, रोज पाण्यात टाकून घेतल्यास होतील अनेक फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल