डायबेटिसवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं! रोज आहारात घ्या 'या' भाज्या, ब्लड शुगर राहील नियंत्रणात
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
डायबेटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही भाज्या अत्यंत फायदेशीर आहेत. आयुर्वेदाचार्य भुवनेश पांडे यांच्या मते...
advertisement
1/5

भारतात रोज आणि प्रत्येक जेवणासोबत भाज्या खाल्ल्या जातात. काही भाज्या अशा आहेत, ज्यांच्या सेवनाने आरोग्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांविषयी माहिती देत आहोत, ज्या आरोग्य राखण्यासोबतच डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
advertisement
2/5
सुमारे चार दशकांपासून सक्रिय असलेले आणि सध्या पतंजलीसोबत काम करणारे बेतिया येथील आयुर्वेदाचार्य भुवनेश्वर पांडे सांगतात की, हिरव्या भाज्यांमध्ये कारल्याचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला अनेक सकारात्मक फायदे मिळतात. हे डायेबिटसच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. यात पॉलीपेप्टाइड-पी नावाचं एक कंपाऊंड आढळतं, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करतं.
advertisement
3/5
दुधी भोपळा पोट आणि शरीर थंड ठेवणारी भाजी म्हणून ओळखली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर, हा आरोग्याचा खजिना आहे. विशेष म्हणजे यात पाणी आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं, पण ग्लुकोज अजिबात नसतं. अशा परिस्थितीत, जर तुम्ही डायेबिटसचे रुग्ण असाल, तर नक्कीच दुधी भोपळ्याचा तुमच्या आहारात समावेश करा.
advertisement
4/5
ब्रोकोली पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यात विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजे असतात, जे उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही डायेबिटसचे रुग्ण असाल, तर तुमच्या उन्हाळ्यातील आहारात ब्रोकोलीचा नक्कीच समावेश करा. त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही आणि ती संतुलित राहते. तुम्ही ती भाजी, सूप किंवा सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता.
advertisement
5/5
पालक लोहाचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. तो चविष्ट असण्यासोबतच पौष्टिकही आहे. विशेषतः जर तुम्ही डायेबिटसचे रुग्ण असाल, तर पालकाचे सेवन तुम्ही अनिवार्यपणे करू शकता. भुवनेश्वर यांच्या मते, पालकमध्ये असे अनेक घटक असतात जे इन्सुलिनच्या स्रावात मदत करतात. तसेच, ते शरीरातील लोहाची कमतरताही दूर करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
डायबेटिसवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं! रोज आहारात घ्या 'या' भाज्या, ब्लड शुगर राहील नियंत्रणात