TRENDING:

विकेण्डला थंडीचा कडाका! पुढील ४८ तास धोक्याचे, मुंबईसह विदर्भात Cold wave अलर्ट; काय सांगतोय हवामान विभाग?

Last Updated:
उत्तर भारतातील थंडी आणि धुक्याचा परिणाम महाराष्ट्रावर, २६-२७ डिसेंबरला मुंबई, विदर्भ, पुणे, नाशिकमध्ये तापमानात २-४ अंशांची घट, शीतलहरीची शक्यता, Cyclonic Circulation सक्रिय.
advertisement
1/6
विकेण्डला थंडीचा कडाका! पुढील ४८ तास धोक्याचे, मुंबईसह विदर्भात Cold wave अलर्ट
उत्तर भारतात सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा आणि दाट धुक्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावर होऊ लागला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसची मोठी घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
विशेषतः २६ आणि २७ डिसेंबर रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंडच्या काही भागात कोल्ड वेवचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कडाक्याच्या थंडीचा प्रवाह आता मध्य भारताकडे सरकत असून, त्याचा फटका महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ क्षेत्राला बसण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
3/6
उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळे मुंबई, पुणे आणि नाशिकच्या किमान तापमानात घसरण होऊन हुडहुडी वाढणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २६ आणि २७ डिसेंबर हे दोन दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत.
advertisement
4/6
मुंबईसह राज्याच्या काही भागांत शीतलहरीसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. विदर्भ आणि लगतच्या छत्तीसगडमध्ये थंडीचा कडाका अधिक तीव्र असेल. यामुळे रात्रीच्या तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातही घट होऊन हाडं गोठवणारी थंडी वाढू शकते.
advertisement
5/6
हवामान प्रणालीचा विचार केला तर, सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि केरळ किनारपट्टीवर Cyclonic Circulation ची स्थिती निर्माण झाली आहे.२७ डिसेंबर रोजी एक नवा 'पश्चिमी विक्षोभ' हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये सक्रिय होत आहे. या प्रणालींमुळे देशाच्या हवामानात मोठे फेरबदल होत आहेत. महाराष्ट्रात पाऊस जरी नसला, तरी ढगाळ हवामान आणि बोचरी थंडी असे संमिश्र वातावरण पाहायला मिळेल.
advertisement
6/6
२६ आणि २७ डिसेंबर रोजी मुंबई, विदर्भ आणि लगतच्या भागात थंडी वाढणार. पुढील २-३ दिवसांत किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट शक्य. उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी मध्यम स्वरूपाच्या धुक्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
विकेण्डला थंडीचा कडाका! पुढील ४८ तास धोक्याचे, मुंबईसह विदर्भात Cold wave अलर्ट; काय सांगतोय हवामान विभाग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल