Weather Alert: गुरुवारी बर्फासारखी थंडी, कल्याण-डोंबिवलीला पुन्हा अलर्ट, कसं असेल हवामान?
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/4

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका जाणवत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात देखील थंडीचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला आहे. अशातच 25 डिसेंबरला पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, शहापूर, मुरबाड परिसराचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/4
कल्याण तालुक्यातील हवामानात गारवा असल्याने आज 25 डिसेंबरला तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. सकाळी धुके असल्याने किमान तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस राहील. दिवसभर तापमान मध्यम व हवामान आल्हाददायक तर रात्री थंडी जाणवेल.
advertisement
3/4
डिसेंबरच्या शेवटी डोंबिवलीमध्ये हवामानात गारठा असल्याने काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबरला किमान तापमान 12 ते 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअस असेल. दिवसभर गारठा जाणवेल आणि सकाळ-संध्याकाळ थंडी अधिक असल्याने नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
4/4
शीतलहरींमुळे हाडं गोठवणारी थंडी जाणवत असून बदलापूरमध्ये किमान तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे. तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात किमान 15 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हवामानातील सततच्या बदलांमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: गुरुवारी बर्फासारखी थंडी, कल्याण-डोंबिवलीला पुन्हा अलर्ट, कसं असेल हवामान?