Shaving Mistakes : शेव्हिंग-व्हॅक्सिंग केल्यानंतर पायांवर काळे डाग पडतात? 'या' चुकीमुळे होतो 'स्ट्रॉबेरी लेग्ज'चा त्रास
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
बऱ्याचदा शेव्हिंग केल्यानंतर पायांवर ठिपक्यांसारखे काळे डाग दिसतात आणि त्वचा खडबडीत होते. याला स्ट्रॉबेरी लेग्ज म्हणतात. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही पण ते दिसायला खूपच वाईट दिसतं.
advertisement
1/7

हे डाग त्वचेवर स्ट्रॉबेरीच्या बियांसारखे दिसतात. यामुळे आपला संपूर्ण लुक खराब होतो. वॅक्सिंग मुळातच आपण पाय सुंदर दिसावे यासाठी करतो. मात्र त्यानंतर पायांवर जर अशाप्रकारचे चिन्ह दिसत असतील तर ते खूप वाईट असतं. मात्र हे कशामुळे होतं आणि त्यापासून वाचण्याचे काही उपायही आहेत.
advertisement
2/7
स्ट्रॉबेरी लेग्जचा त्रास होण्यामागे काही विशेष कारणं असतात. जसे की, त्वचेवरच्या छिद्रात किंवा केसांच्या मुळांमध्ये तेल, जीवाणू किंवा मृत त्वचा साचल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. याचा आपल्या रोग्याला धोका नसतो. पण यामुळे पाय खराब दिसतात आणि शर्ट ड्रेस घालता येत नाही.
advertisement
3/7
शेव्हिंग करताना जुना किंवा बोथट रेझर वापरल्याने हा त्रास होऊ शकतो. यासोबतच शेव्हिंग क्रीमशिवाय शेव्हिंग केल्यानेही त्वचेचं नुकसान होतं आणि 'स्ट्रॉबेरी लेग्ज' दिसायला लागतात. शिवाय कोरड्या त्वचेवर शेव्हिंग केल्यानेही 'स्ट्रॉबेरी लेग्ज' दिसू शकतात.
advertisement
4/7
आपल्याव त्वचेवर लहान लहान छिद्र असतात, जी तेल आणि घाम बाहेर टाकतात. यामुळेच आपलं शरीर थंड राहातं. पण शेव्हिंग करताना ही छिद्र तेल आणि हवेच्या संपर्कात येतात, ज्यामुळे ती नेहमीपेक्षा जास्त गडद दिसतात.
advertisement
5/7
स्ट्रॉबेरी लेग्जचा त्रास जास्तकरून चुकीच्या पद्धतीनं शेव्हिंग केल्यानं होतो. म्हणून नेहमी धारदार रेझर वापरा आणि ब्लेड वारंवार बदला. ड्राय शेव्हिंग करणं शक्यतो टाळाच. त्याऐवजी हायड्रेटिंग शेव्हिंग क्रीम किंवा जेल वापरा.
advertisement
6/7
शेव्ह केल्यानंतर त्वचा हायड्रेटेड ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी शेव्हिंग केल्यानंतर नैसर्गिक तेल आणि शिया बटर असे घटक असलेले मॉइश्चरायझर वापरा. स्ट्रॉबेरी लेग्जचा त्रास होऊ नये म्हणून सुटी कपडे वापरा. कारण घट्ट आणि सिंथेटिक कपड्यांमुळे घाम बाहेर पडत नाही आणि त्वचेवर घर्षण झाल्यामुळं त्वचेची छिद्रे बंद होतात.
advertisement
7/7
हा त्रास टाळायचा असेल तर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्वचेला वारंवार स्क्रब करू नका. अल्कोहोलयुक्त मॉइश्चरायझर वापरू नका. एक्सफोलिएशननंतर त्वचा मॉइश्चराइझ करायला अजिबात विसरू नका. त्वचा मॉइश्चराइज करणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Shaving Mistakes : शेव्हिंग-व्हॅक्सिंग केल्यानंतर पायांवर काळे डाग पडतात? 'या' चुकीमुळे होतो 'स्ट्रॉबेरी लेग्ज'चा त्रास