कामदा एकादशीला तुळशीचे 'हे' 5 उपाय कराच, घराला लागलेली गरिबीची कळा कायमची होईल दूर!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
यंदा 29 मार्च 2026 रोजी कामदा एकादशी येत आहे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच या दिवशी तुळशीची सेवा केल्याने घरावरील आर्थिक संकट दूर होऊन सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे.
advertisement
1/7

हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यातही 'कामदा एकादशी' ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी एकादशी मानली जाते. यंदा 29 मार्च 2026 रोजी कामदा एकादशी येत आहे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच या दिवशी तुळशीची सेवा केल्याने घरावरील आर्थिक संकट दूर होऊन सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे.
advertisement
2/7
तुळशीला दुधमिश्रित जल अर्पण करा: कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान आटोपल्यानंतर तांब्याच्या कलशात थोडे कच्चे दूध आणि गंगाजल मिसळून ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात आणि घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो, असे मानले जाते. मात्र, लक्षात ठेवा की एकादशीला तुळशीला जास्त पाणी घालू नये, कारण ती देखील विष्णूंसाठी निर्जळी उपवास करते.
advertisement
3/7
पांढऱ्या किंवा पिवळ्या चंदनाचा टिळक: तुळशीच्या रोपाला आणि कुंडीला पांढऱ्या किंवा पिवळ्या चंदनाचा टिळक लावावा. हेच चंदन नंतर भगवान विष्णूंनाही अर्पण करावे. या उपायामुळे वैवाहिक जीवनातील कटकटी दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
advertisement
4/7
संध्याकाळी तुपाचा दिवा आणि परिक्रमा: कामदा एकादशीच्या संध्याकाळी तुळशीजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. त्यानंतर तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील दरिद्रता दूर होऊन संपत्तीचे मार्ग मोकळे होतात.
advertisement
5/7
शालिग्राम आणि तुळशीची पूजा: जर तुमच्या घरात शालिग्राम असतील, तर त्यांना तुळशीचे पान अर्पण करा. विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.
advertisement
6/7
तुलसी 108 नाम किंवा चालीसा पठण: या दिवशी तुळशीसमोर बसून 'तुलसी चालीसा' किंवा तुळशीच्या 108 नावांचे पठण करावे. ज्यांना करिअरमध्ये यश मिळत नाही, त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि कामातील अडथळे दूर होतात.
advertisement
7/7
एक विशेष नियम: एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. शास्त्रानुसार एकादशीला तुळशीची पाने तोडणे महापाप मानले जाते. पूजेसाठी लागणारी पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावीत. तसेच, रविवारी किंवा एकादशीला तुळशीला स्पर्श करणे टाळावे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
कामदा एकादशीला तुळशीचे 'हे' 5 उपाय कराच, घराला लागलेली गरिबीची कळा कायमची होईल दूर!