TRENDING:

सागवानी लाकडापासून बनलेल्या देवघराची करायचीय खरेदी? ‘इथं’ 1 हजारांपासून आकर्षक पर्याय उपलब्ध

Last Updated:
आपल्या घरामध्ये सुंदर असे देवघर असावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. लाकडापासून बनवण्यात आलेल्या देवघराची वेगवेगळे आकर्षक पर्याय इथे उपलब्ध आहेत.
advertisement
1/6
देवघराची करायचीय खरेदी? ‘इथं’ 1 हजारांपासून आकर्षक पर्याय उपलब्ध
आपल्या घरामध्ये सुंदर असे देवघर असावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे अश्या प्रकारचे देवघर कुठे मिळेल याचा शोध घेतला जातो. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> शहरातील लक्कड कोट भागामध्ये लाकडापासून बनवण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू मिळतात. लाकडापासून बनवण्यात आलेल्या देवघराची वेगवेगळे आकर्षक पर्याय इथे उपलब्ध आहेत.
advertisement
2/6
जालना शहरातील रहिवासी असलेले अर्जुन ढोलके यांची 1976 पासून लक्कडकोट भागामध्ये शॉप आहे. मागील 50 वर्षांपासून ते देवघर निर्मितीचा व्यवसाय करतात. ते ग्राहकांच्या डिमांडनुसार ऑर्डर घेऊन त्याप्रमाणे देवघर तयार करून देतात.
advertisement
3/6
आपल्याकडे असलेल्या देवघरांची निर्मिती ही सागवानी लाकडापासून होते. सागवानी लाकडा शिवाय कुठलेही लाकूड देवघर निर्मितीसाठी वापरले जात नाही, असं अर्जुन ढोलके यांनी सांगितलं.
advertisement
4/6
देवघर खरेदी करण्यासाठी लोकांची जास्त मागणी ही मध्यम आकाराच्या देवघरांसाठी आहे. 21 बाय 17 21 बॉय 21 या प्रकारचे देवघरे सर्वाधिक विकली जातात. याचे कारण म्हणजे ते दिसण्यासाठी देखील आकर्षक असतात आणि लोकांना घेण्यासाठी देखील परवडणे योग्य असतात. 1 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतचे देवघर आमच्याकडे उपलब्ध आहेत, असं अर्जुन ढोलके सांगतात.
advertisement
5/6
घरातील मंदिरामध्ये जी देवघर असतं त्यामध्ये मोर आणि हत्ती हे अनिवार्य आहे भारतीय संस्कृतीमध्ये या दोन्ही प्राण्यांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक देवघरांमध्ये आम्ही या दोन प्राण्यांची डिझाईन अवश्य लावतो.
advertisement
6/6
त्याचबरोबर देवघरामध्ये स्वस्तिक आणि ओम यांचा देखील समावेश केलेला असतो. त्याचबरोबर लोकांनी आणखी काही मागणी केल्यास त्या पद्धतीने देखील आम्ही त्यावर डिझाईन तयार करून देतो, असं ढोलके यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सागवानी लाकडापासून बनलेल्या देवघराची करायचीय खरेदी? ‘इथं’ 1 हजारांपासून आकर्षक पर्याय उपलब्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल