Diwali Decoration : दिवाळीत घर सजवण्यासाठी आयडिया हव्यात? हे आहेत काही सुंदर पॉकेट फ्रेंडली डेकोरेशन्स
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
दिवाळीला साफसफाई केल्यानंतर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घराची सजावट. दिवाळीमध्ये प्रत्येकाला आपलं घर सुंदर दिसावं अशी इच्छा असते. यासाठी आज आम्ही काही सजावटीच्या काही सोप्या टिप्स सांगणारा आहोत.
advertisement
1/10

दसऱ्यानंतर लगेच दिवाळीची तयारीही बहुतेक घरांमध्ये सुरू होते. या दरम्यान अनेक लोक घराची साफसफाई आणि घर सजवण्याच्या धडपडीत व्यस्त होतात.
advertisement
2/10
दिवाळीत लोक घराला रंग देतात. मात्र रंग न देता फक्त साफसफाई करून आणि सजावट करून तुम्ही घर आकर्षक बनवू शकतात. तेही अगदी कमीत कमी वस्तूंमध्ये.
advertisement
3/10
सर्वात आधी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावा. यासाठी तुम्ही ताज्या फुलांचं किंवा आर्टिफिशिअर तोरणही लावू शकता.
advertisement
4/10
घराला उत्तम लूक देण्यासाठी तुम्ही घराच्या भिंती, खिडक्या आणि दारांना लायटिंगदेखील लावू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंगने तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल. (Image - Canva)
advertisement
5/10
फुलांनी घर सजावल्याने घर सुंदरही दिसेल आणि घरामध्ये एक छान सुगंधही दरवळेल. ताज्या फुलासोबतच तुम्ही कृत्रिम फुलांची मदत घेऊ शकता. या फुलांचा तुम्ही पुन्हा वापर करू शकाल.
advertisement
6/10
घराचे मुख्य गेट आणि अंगण आकर्षक करण्यासाठी तुम्ही रांगोळी देखील काढू शकता. रंगीबेरंगी किंवा फुलांनी सुंदर रांगोळी बनवण्यासोबतच या रांगोळीला तुम्ही दिव्यांनीही सजवू शकतात.
advertisement
7/10
दिवाळीला दिव्यांचे महत्व असते. घर उजळून टाकण्यासाठी दिव्यांचा वापर उत्तम ठरू शकते. यामुळे तुमचे संपूर्ण घर तर उजळून निघेलच, पण घराची सजावटही खूप चमकेल. (Image - Canva)
advertisement
8/10
घर सजवण्यासाठी तुम्ही मेणबत्त्या आणि मातीची भांडी देखील वापरू शकता. ड्रॉईंग रूमपासून खिडकीपर्यंत सुंदर भांडी ठेवून तुम्ही घराची सजावट वाढवू शकता. (Image - Canva)
advertisement
9/10
दिवाळीच्या दिवशी घराला वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी फ्लॉवर स्कर्ट्सही लावू शकता. तुमच्या घराच्या भिंतींवर लिली आणि गुलाबाची फुले खूप छान दिसतील. (Image - Canva)
advertisement
10/10
घराचे मुख्य दार सजवल्यानंतर अंगणात किंवा घराच्या वरच्या बाजूला आकाशदिवे लावा. हल्ली बाजारात खूप सुंदर आकाशदिवे मिळतात किंवा तुम्ही मुलांसोबत मिळून घरीच ते बनवूही शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Decoration : दिवाळीत घर सजवण्यासाठी आयडिया हव्यात? हे आहेत काही सुंदर पॉकेट फ्रेंडली डेकोरेशन्स