TRENDING:

Kitchen Tips : तुम्हीही 'हे' पदार्थ फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवता? आजपासूनच करा बंद, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Last Updated:
Do not put these food items in fridge door : आपण फ्रीजचा पुरेपूर वापर करतो. बऱ्याचदा फ्रिजमध्ये जागा नसल्यावर आपण फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवतो किंवा काही वस्तू आपण सवयीने तिथेच साठवतो, कारण नंतर त्या लवकर सापडतात. मात्र तुम्हाला माहितीये का, याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल विशेष माहिती देत आहोत.
advertisement
1/9
तुम्ही हे पदार्थ फ्रिज डोअरमध्ये ठेवता? लगेच करा बंद, तज्ज्ञांनी सांगितले धोके
फ्रीज आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची वस्तू हल्ली बनलीय. मुंबईसारख्या उष्ण शहरांमध्ये तर फ्रिजशिवाय घरातले अन्न पदार्थ टिकवून ठेवणं अगदी अश्यक्य वाटतं. मात्र याच फ्रीजचा आपण योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात. आज आपण फ्रिजच्या डोअरमध्ये कोणत्या वस्तू साठवू नये याबद्दल माहिती घेत आहोत.
advertisement
2/9
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) मते, फ्रीजचा दरवाजा सर्वात उष्ण भाग असतो. त्यामुळे ज्या वस्तूंना सतत थंड तापमानाची आवश्यकता असते अशा वस्तूं त्यामध्ये ठेवू नये. अन्न चांगले राहण्यासाठी फ्रिज 40°F (4°C) किंवा त्यापेक्षा कमी तापमानावर असावे. मात्र फ्रिजच्या डोअरमध्ये ते तापमान स्थिर राहात नाही. म्हणूनच तज्ञांच्यामते काही वस्तू फ्रिजच्या डोअरमध्ये ठेऊ नये.
advertisement
3/9
अंडी : अंडी जास्त काळ टिकवायची असतील तर त्यांनाही स्थिर तापमानात साठवणे आवश्यक असते. फ्रिजच्या डोअरमध्ये अंडी ठेवल्यास ती जास्त काळ फ्रेश राहात नाहीत. शिवाय इथे ठेवल्याने बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका वाढतो आणि फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते.
advertisement
4/9
दूध आणि दही : दूध हा लवकर खराब होणारा पदार्थ आहे. त्याला सतत थंड वातावरणाची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी तुम्ही फ्रिज उघडता तेव्हा ते गरम हवेच्या संपर्कात येते आणि खराब होण्याची शक्यता वाढते. दुधाप्रमाणेच, दह्याचे प्रोबायोटिक्स टिकवून ठेवण्यासाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी तेदेखील स्थिर थंड तापमानात ठेवणे आवश्यक असते. डोअरमधील सततच्या तापमान बदलाचा दूध आणि दह्यावर विपरीत परिणाम होतो.
advertisement
5/9
ज्यूस : हल्ली बरेच लोक फळांचा ज्यूस पिणे पसंत करतात. ते आरोग्यासाठी चांगलेदेखील असते. मात्र हा ज्यूस तुम्ही फ्रिजमध्ये कुठे साठवता यामुळेही त्याच्या गुणवत्तेवर वाईट होतो. ताजा ज्यूस स्थिर तपमानात न ठेवल्यास तो लवकर आंबू शकतो. ताजेपणा आणि चव टिकवण्यासाठी तेफ्रिजच्या आतील भागात ठेवणे आवश्यक असते.
advertisement
6/9
बटर, चीज आणि मेयोनेझ : बटरवरही फ्रिजच्या अस्थिर तापमानाचा वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे चीजदेखील फ्रिजच्या आत साठवावे. विशेषतः मोझरेला, ब्री किंवा क्रीम चीज सारख्या मऊ प्रकारांना बुरशी लागण्याची आणि खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते फ्रिजमध्ये स्थिर तापमानात ठेवावे. मेयॉनीजदेखील एकदा उघडल्यानंतर स्थिर थंड वातावरणात साठवावे. अन्यथा त्यातील तेल आणि अंडी खराब होण्याची शक्यता असते.
advertisement
7/9
सॅलड ड्रेसिंग : बरेच फिटनेस फ्रिक लोक आता सॅलड खाण्याला प्राधान्य देतात. पण सॅलड रोज खाण्यासाठी त्यामध्ये रोज काहीतरी वेगळी चव त्यांना हवी असते. अशावेळी वेगवेगळे सॅलड ड्रेसिंग्ज वापरले जातात. बरेच सॅलड ड्रेसिंग्ज क्रिमी असतात. ते फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवल्यास लवकर खराब होऊ शकतात.
advertisement
8/9
मांस : कच्चे मांस खूप काळजीपूर्वक साठवावे लागते. कारण त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता जास्त असते. हे कच्चे मांस फ्रिजच्या डोअरमध्ये साठवल्यास याचा धोका जास्त वाढतो. म्हणूनच मांस साठवण्यासाठी ते फ्रिजच्या आता थंड आणि स्थिर तापमानात साठवावे. फ्रिजचा खालचा शेल्फ मांसासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : तुम्हीही 'हे' पदार्थ फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवता? आजपासूनच करा बंद, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल