Sitting Position : ताठ बसणं धोकादायक! कोल्हापुरातील हाडांचे डॉक्टर म्हणाले याचा फायदा नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sitting Straight : आपल्याला लहानपणापासून ताठ बसायला शिकवलं जातं, याचे फायदे सांगितले जातात. पण कोल्हापुरातील एका डॉक्टरने मात्र ताठ बसणं धोकादायक असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
1/5

ए ताठ बस... घरी आईबाबा, आजी-आजोबा आणि शाळेत शिक्षक आपल्याला ताठ बसायला सांगायचे. बसताना पाठीत थोडा जरी बाक आला तरी ओरडायचे.
advertisement
2/5
लहानपणापासूनच आपल्याला ताठ बसायला शिकवलं जातं. पण कोल्हापुरच्या एका डॉक्टरने मात्र ताठ बसणं धोकादायक असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
3/5
डॉ. गिरीश मोटे असं या डॉक्टरांचं नाव. ते कोल्हापुरातील ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत. ते म्हणाले, "अति सर्वत्र वर्जे असं वाक्य आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरके झाला तर तो त्रासदायक आहे", याला ताठ बसणंही अपवाद नाही.
advertisement
4/5
"एकाच पोझिशन किंवा पोश्चरमध्ये एक तासापेक्षा अधिक वेळ बसणं रिस्की असतं. जास्त ताठ बसून याचा शरीराला फायदा होणार आहे, तर तसं नाही. यामुळेही त्रास होणार आहे, ताण येणार आहे", असं डॉ, मोटे यांनी एका पॉडकास्टवर बोलताना सांगितलं.
advertisement
5/5
ताठ बसल्याने स्नायू आणि सांध्यांवर ताण येतो, पाठीचा कणा आणि खांद्यांमध्ये जडपणा आणि वेदना होऊ शकते, रक्तप्रवाह आणि हालचाल कमी होते, ज्यामुळे दीर्घकाळात स्नायू कमकुवत होतात आणि कडकपणा वाढतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sitting Position : ताठ बसणं धोकादायक! कोल्हापुरातील हाडांचे डॉक्टर म्हणाले याचा फायदा नाही