TRENDING:

विशीतच झालात अंकल, आंटी? पांढरे केस लपवता कसले, करा 'हे' 5 उपाय

Last Updated:
केवळ आजी-आजोबांचे केस पांढरे होतात, असं आपल्याला पूर्वी वाटायचं. परंतु आता मात्र कमी वयात केस पांढरे होणे हे सर्वसामान्य झालंय. परंतु इतरांचे पिकलेले केस पाहायला जरी सामान्य वाटत असलं, तरी स्वतःचे केस पिकल्यावर मात्र आपण ते लपवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे उपाय करतो. आयुर्वेदातसुद्धा पांढऱ्या केसांवर अनेक उपाय सांगितलेले आहेत. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी / हजारीबाग)
advertisement
1/7
विशीतच झालात अंकल, आंटी? पांढरे केस लपवता कसले, करा 'हे' 5 उपाय
बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि अवेळी जेवण ही केस पांढरे होण्यामागे महत्त्वाची कारणं आहेत. आजकाल तरुणांमध्येच नाही, तर शालेय विद्यार्थ्यांमध्येही ही समस्या पाहायला मिळते. वयाच्या तिशीपर्यंत पुरुषांच्या दाढीचे केससुद्धा पांढरे झालेले असतात. कमी वयात केस पांढरे झाल्याने अनेकजणांचा आत्मविश्वास कमी होतो.
advertisement
2/7
झारखंडच्या हजारीबागेतील डॉक्टर जितेंद्र उपाध्याय सांगतात की, पांढऱ्या केसांवर आयुर्वेदात रामबाण उपाय सांगितलेले आहेत. त्यांच्या वापराने काळेभोर केस पांढरे होण्यापासून रोखता येऊ शकतं.
advertisement
3/7
पांढऱ्या केसांवर आवळा रामबाण मानला जातो. दररोज कमीत कमी एक आवळा खावा. आपण आवळ्याचे विविध पदार्थही खाऊ शकता.
advertisement
4/7
कढीपत्ता घातलेल्या नारळाच्या तेलामुळेसुद्धा केस पांढरे होण्यापासून रोखता येतं. त्यासाठी नारळाच्या तेलात कढीपत्ता शिजवावा. मिश्रण थंड झाल्यावर त्याने डोक्याला मालिश करावी. त्यामुळे केस मजबूत होतात.
advertisement
5/7
त्रिफळाचं चूर्ण केसांसाठी रामबाण मानलं जातं. शिवाय पोटात आग पडली असेल तर त्यावरही आराम मिळतो. तसंच दररोज झोपण्यापूर्वी त्रिफळाचं चूर्ण खाल्ल्यास केस पांढरे होणं थांबतं.
advertisement
6/7
ऑलिव्ह ऑइल केसांसाठी अत्यंत उपयुक्त मानतात. आंघोळीपूर्वी ऑलिव्ह ऑइलने केसांना मालिश केल्यास मूळं भक्कम होतात.
advertisement
7/7
भृंगराज तेलही केसांसाठी अत्यंत उपयुक्त असतं. केसांना फाटे फुटणं, केस विरळ होणं, यावर हे तेल म्हणजे रामबाण उपाय मानला जातो. हे तेल जाडसर असतं. ते पातळ हवं असेल तर त्यात नारळाचं तेल मिसळावं. आंघोळीपूर्वी 5 मिनिटं या तेलाने केसांना मालिश करावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
विशीतच झालात अंकल, आंटी? पांढरे केस लपवता कसले, करा 'हे' 5 उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल