TRENDING:

ice cream : तुम्ही आइस्क्रीम समजून भलताच थंड पदार्थ तर खात नाही ना? अनेक लोक फसतात आणि...

Last Updated:
उन्हाळ्यात आइस्क्रीम खाणं अनेकांना आवडतं. उन्हाळ्यात आइस्क्रीम जिवाला थंडावा देतं. काही जण जेवणानंतर आइस्क्रीम खातात, तर काही जण मात्र जेव्हा मूड होईल, तेव्हा खातात. तुम्हीही आइस्क्रीम खात असाल तर ते नक्की आइस्क्रीम आहे का, याची खात्री करत चला.
advertisement
1/7
तुम्ही आइस्क्रीम समजून भलताच थंड पदार्थ तर खात नाही ना? अनेक लोक फसतात आणि...
उन्हाळ्यात आइस्क्रीम खाणं अनेकांना आवडतं. उन्हाळ्यात आइस्क्रीम जिवाला थंडावा देतं. काही जण जेवणानंतर आइस्क्रीम खातात, तर काही जण मात्र जेव्हा मूड होईल, तेव्हा खातात. तुम्हीही आइस्क्रीम खात असाल तर ते नक्की आइस्क्रीम आहे का, याची खात्री करत चला.
advertisement
2/7
कारण जे तुम्ही आइस्क्रीम समजून खाताय ते फ्रोझन डेझर्ट असू शकतं. ऐकायला थोडं विचित्र वाटेल; पण आइस्क्रीम व फ्रोझन डेझर्ट या दोन्ही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत आणि बऱ्याच जणांना याबाबत माहिती नसतं. दिसायला दोन्ही प्रकार सारखे असले तरी त्यात फरक आहे. तो फरक नेमका काय आहे आणि दोन्हींपैकी काय खाणं शरीरासाठी चांगलं आहे, ते जाणून घेऊ या.
advertisement
3/7
आइस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टमध्ये फरक असतो तो ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे. फ्रोझन डेझर्ट व्हेजिटेबल फॅटपासून बनवलं जातं, तर आइस्क्रीम दूध किंवा क्रीम म्हणजेच डेअरी फॅटपासून बनवलं जातं.
advertisement
4/7
बहुतेक ब्रँड पॅकच्या कोपऱ्यात लहान अक्षरांत फ्रोझन डेझर्ट असं लिहिलेलं असतं. ते इतकं लहान लिहिलेलं असतं, की स्पष्ट दिसत नाही.
advertisement
5/7
या दोन्हींत असलेल्या कॅलरीज आणि फॅटबद्दल बोलायचं झाल्यास फ्रोझन डेझर्टमध्ये 20 किलोकॅलरी एनर्जी असते तर 10.5 ग्रॅम फॅट असतं. तसंच 5.8 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असतं. आइस्क्रीममध्ये 219 किलोकॅलरी एनर्जी आणि 13 ग्रॅम फॅट, तसंच 8.5 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असतं. डॉक्टरांच्या मते, फ्रोझन डेझर्ट नैसर्गिकरीत्या कोलेस्टेरॉल फ्री असतात. कारण व्हेजिटेबल फॅटमध्ये कॉलेस्टेरॉल नसतं.
advertisement
6/7
आरोग्यासाठी काय चांगलं? कॅलरीजच्या हिशेबाने पाहिल्यास फ्रोझन डेझर्ट जास्त हेल्दी आहे. आइस्क्रीम फक्त कधी तरी खाऊ शकतो. कारण त्यात हाय कार्ब्ज, शुगर आणि फॅट्स जास्त असतात. तुम्ही घरी फ्रोझन डेझर्टदेखील बनवू शकता आणि त्यात क्रीम ऐवजी थोडं दही घालू शकता, यामुळे ते अधिक हेल्दी होईल.
advertisement
7/7
आइस्क्रीममध्ये लॅक्टोजचं प्रमाण जास्त असतं; पण जास्त लॅक्टोजमुळे पोट खराब होऊ शकतं. फ्रोझन डेझर्टमध्ये एंझाइम्स असतात. ती पचनसंस्था निरोगी ठेवतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ice cream : तुम्ही आइस्क्रीम समजून भलताच थंड पदार्थ तर खात नाही ना? अनेक लोक फसतात आणि...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल