कॉफी प्यायल्यानं खरंच वजन कमी होतं का? यामागे काय आहे कारण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
असं म्हटलं जातं की, कॉफी प्यायल्यावर वजन कमी होतं. मात्र ही गोष्ट कितपत खरी आहे, यामागे काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

असं म्हटलं जातं की, कॉफी प्यायल्यावर वजन कमी होतं. मात्र ही गोष्ट कितपत खरी आहे, यामागे काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
कॉफी आणि वजन कमी होणे याचा काय संबंध आहे हे संशोधनात आढळून आलं आहे.
advertisement
3/7
संशोधकांनी 1986 ते 2010 आणि 1991 ते 2015 वयोगटातील लोकांवर संशोधन केलं. त्यांचा डाटा जमवून हे समोर आलं की, कॉफी पिणाऱ्याचे वजन कमी आहे मात्र साखर घालून पिणाऱ्यांचे वजन जास्त.
advertisement
4/7
अभ्यासात असं दिसलं की दर चार वर्षानं लोकांचं वजन वाढत आहे. दिवसाला एक कप न गोड, कॅफिनयुक्त किंवा डिकॅफिनयुक्त कॉफी घेतल्यानं चार वर्षांत अपेक्षेपेक्षा 0.12 किलो वजन कमी होते. मात्र, दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ घातल्याने त्यावर काहीही परिणाम होत नाही. तर एक चमचा साखर घातल्याने वजन अपेक्षेपेक्षा 0.09 किलोने वाढले.
advertisement
5/7
अनेक वर्षांपासून लोकांकडून त्यांती माहिती घेतली जात होती. कॉफीमुळे वजनावर बराच परिणाम होतो.
advertisement
6/7
कॅफीन हे एक नैसर्गिक उत्तेजक आहे जे तात्पुरते भूक कमी करते आणि एनर्जी वाढवते. यामुळे आपल्याला काही काळासाठी कमी भूक लागते. बरेच लोक त्यांचा व्यायाम क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करण्यापूर्वी कॉफी पितात. कॅफिन आपल्या चयापचयाचा वेग देखील वाढवते.
advertisement
7/7
कॉफी व्यतिरिक्त अनेक गोष्टी वजनावर परिणाम करतात. खाद्या व्यक्तीने त्याच्या आरोग्याच्या स्थितीनुसार वजन कमी करण्यासाठी आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.