TRENDING:

Weight Gain Causes : कितीही व्यायाम करा, होणार नाही फायदा! जेवताना केलेली 'ही' चूक, वेगाने वाढवेल वजन

Last Updated:
Unhealthy Eating Habits : वजन कमी करण्यासाठी लोक खूप पर्यटन करतात. कठीण व्यायाम करतात, अगदी कठोर डाएटिंग करतात. अनेक आवडीचे पदार्थ खाणं सोडतात. आवडत नसलेले पदार्थ खातात. मात्र तरीही काही व्यक्तींचे वजन कमी होत नाही. याला कारणीभूत आपली एक सवय असते. जेवताना लोक सर्रास ही चूक करतात, त्याचे परिणाम आपल्या वजनावर होतात. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
advertisement
1/7
कितीही व्यायाम करा, होणार नाही फायदा! जेवताना केलेली 'ही' चूक, वेगाने वाढवेल वजन
आजच्या डिजिटल युगात अनेक जण जेवताना मोबाईलवर रील्स, व्हिडीओ किंवा टीव्ही पाहण्याची सवय लावून घेतात. ही सवय निरुपद्रवी वाटत असली तरी आरोग्यासाठी ती धोकादायक ठरू शकते. विशेषतः जेवताना रील्स पाहिल्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो, असे संशोधनातून समोर आले आहे. ही सवय हळूहळू लठ्ठपणाकडे घेऊन जाऊ शकते.
advertisement
2/7
बीजिंग विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, जेवताना फोन वापरणे किंवा स्क्रीन पाहणे शरीरावर नकारात्मक परिणाम करते. जेव्हा आपले लक्ष अन्नाऐवजी स्क्रीनकडे असते, तेव्हा मेंदूला पोट भरल्याचे संकेत मिळत नाही. परिणामी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खाते. जेवताना लक्ष विचलित झाल्यामुळे अन्नाची चव, वास आणि पोत याची जाणीव कमी होते. शरीराला समाधान मिळत नाही आणि पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होते. यामुळे सतत खाण्याची सवय लागून वजन वाढण्यास सुरुवात होते.
advertisement
3/7
रील्स किंवा व्हिडीओ पाहताना अनेकदा जंक फूड, मसालेदार किंवा प्रोसेस्ड पदार्थांचे व्हिज्युअल्स दिसतात. यामुळे अशा अनहेल्दी पदार्थांची इच्छा वाढते. हे पदार्थ मेटाबॉलिज्म मंद करतात आणि शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते, ज्याचा थेट परिणाम वजनवाढीवर होतो.
advertisement
4/7
संशोधनात असेही आढळून आले आहे की, जेवताना स्क्रीन पाहण्याच्या सवयीमुळे दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. डायबिटीज, उच्च रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या समस्यांचा संबंध या सवयीशी जोडला गेला आहे. म्हणजेच ही सवय केवळ वजन वाढवत नाही, तर एकूण आरोग्यालाही धोका निर्माण करते.
advertisement
5/7
लक्ष दुसरीकडे असल्यामुळे अनेक जण खूप वेगाने जेवतात. घाईघाईने खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो आणि टाइप-2 डायबिटीज, उच्च रक्तदाब तसेच किडनीसंबंधित आजारांचा धोका वाढतो. यासोबतच स्क्रीन टाइममुळे निष्क्रिय जीवनशैली वाढते, जी अनेक आजारांचे मूळ कारण ठरते.
advertisement
6/7
म्हणूनच आरोग्य टिकवण्यासाठी जेवताना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहणे गरजेचे आहे. शांतपणे, लक्षपूर्वक जेवण्याची सवय लावल्यास पोट लवकर भरते, अन्नाचा आनंद मिळतो आणि वजन नियंत्रणात राहते. लहानशी सवय बदलून आपण लठ्ठपणा आणि अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Gain Causes : कितीही व्यायाम करा, होणार नाही फायदा! जेवताना केलेली 'ही' चूक, वेगाने वाढवेल वजन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल