TRENDING:

Mumbai Street Food: 7 सर्वोत्तम फूड स्पॉट, पदार्थ पाहूनच तोंडाला सुटतं पाणी

Last Updated:
लुसलुशीत पाव, त्यात चण्याच्या पिठात तळलेला बटाट्याचा चमचमीत गरमागरम वडा, त्यावर लाल चटणी, हिरवी चटणी आणि झणझणीत हिरवी मिरची असा स्वादिष्ट वडापाव म्हणजे मुंबईची ओळख. मुंबईत कुठेही खाल्ला तरी एका वडापाववर काही खवय्यांचं भागत नाही एवढा तो टेस्टी लागतो. परंतु मुंबईत आणखीही काही पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. आज आपण वडापावव्यतिरिक्त मुंबईत लय भारी स्ट्रीट फूड कुठे मिळतं अशी 7 ठिकाणं पाहणार आहोत. (प्रियंका जगताप, प्रतिनिधी / मुंबई)
advertisement
1/7
Mumbai Street Food: 7 सर्वोत्तम फूड स्पॉट, पदार्थ पाहूनच तोंडाला सुटतं पाणी
क्रॉफर्ड मार्केटमधल्या गुलशन-ए-इराणचा कीमा पाव : अत्यंत कमी किंमतीत स्वादिष्ट मुघलाई वैशिष्ट्यांसाठी गुलशन-ए-इराण हे त्यांच्या कीमा पावपासून चिकन टिक्का मसाला, लसूण नान, रबडी कुल्फी आणि मिठाईसाठी सुप्रसिद्ध आहे. इथं सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ साधारण 450 रुपयांना मिळतात.
advertisement
2/7
भेंडी बाजारातल्या नूर मोहम्मदीची पांढरी बिर्याणी : भेंडी बाजार हे मुंबईतलं सर्वोत्तम स्ट्रीट फूड ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. इथली पांढरी बिर्याणी अतिशय प्रसिद्ध आहे. जिची किंमत आहे 300 रुपये.
advertisement
3/7
चर्चगेटच्या के. रुस्तममधलं आइस्क्रीम सँडविच / बिस्किट : मुंबईतल्या सर्वात प्रसिद्ध आइस्क्रीम पार्लरपैकी एक असलेल्या के. रुस्तममध्ये दररोज शेकडो ग्राहकांची रेलचेल असते. काळ्या मनुका ते कॉफी, कच्ची कैरी, बदाम कुरकुरीत, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि दोन वेफर्समध्ये ते आइस्क्रीम बनवून देतात. तिची किंमत आहे 100 रुपये.
advertisement
4/7
राजेश कॉर्नर : इथं उत्कृष्ट दर्जाचे कॉर्न मिळतात. म्हणूनच हे ठिकाण मुंबईकरांमध्ये लोकप्रिय आहे. इथं कॉर्न आणि बेबी कॉर्न जवळपास शंभरहून अधिक फ्लेवर्समध्ये मिळतात. ज्यात पिझ्झा-पास्ता रोस्टेड कॉर्न, स्पायसी चीज कॉर्न, मेक्सिकन कॉर्न प्रसिद्ध आहेत. त्यांची किंमत आहे 100 रुपये.
advertisement
5/7
विलेपार्लेच्या अमर ज्यूस सेंटरमधली पावभाजी : काळी पावभाजी, मारुती पावभाजी, मसालेदार पावभाजी, खडा पावभाजी, चीज पावभाजी, पनीर पावभाजी, अमर स्पेशल पावभाजी, इत्यादींसह 15 पेक्षा जास्त प्रकारच्या पावभाजी इथं खवय्यांना खायला मिळतात. 200 रुपयांपासून या पावभाजीची किंमत सुरू होते.
advertisement
6/7
अंधेरी लोखंडवालातील ब्रेडक्राफ्टमधल्या फ्रँकीज : हे विविध प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी फ्रँकीज, श्वारमा असलेलं एक लहान, आरामदायी ठिकाण आहे. इथं कॉलेज ग्रुप आवडीनं येतात. इथल्या एका फ्रँकीची किंमत आहे साधारण 100 रुपये.
advertisement
7/7
रुईया कॉलेजजवळील मामाजीचं चॉकलेट सँडविच : <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/mumbai-samant-brothers-has-famous-sweet-shop-in-dadar-for-91-years-see-video-mspd-1199065.html">मुंबई</a>तील स्ट्रीट <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food/anitaben-shah-has-been-running-khakhra-business-in-kolhapur-for-34-years-mspk-l18w-1199315.html">फूड</a>मध्ये चॉकलेट सँडविच सामान्य आहेत, परंतु रुईया कॉलेजसमोरील पार्कजवळ विकलं जाणारे हे चॉकलेट सँडविच <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/do-almonds-really-improve-memory-l18w-mhij-1198840.html">सर्वोत्तम</a> असतं. त्यात Hershey'sचं चॉकलेट आणि काही चांगल्या दर्जाचं डार्क चॉकलेट वापरलं जातं. 50 रुपयांत मिळणारं हे सँडविच म्हणजे चवीच्या बाबतीत जणू स्वर्गसुख देतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Mumbai Street Food: 7 सर्वोत्तम फूड स्पॉट, पदार्थ पाहूनच तोंडाला सुटतं पाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल