अर्धांगवायूनं गाठलं पण हार नाही मानली, ज्योती मावशींच्या हाताची चवच न्यारी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
अर्धांगवायूनं डावा हात निकामी झाला पण एका हाताने ज्योती मावशी स्वयंपाक बनवतात.
advertisement
1/7

एखाद्या महिलेने ठरवले तर ती काहीही करू शकते. एखादी गोष्ट करण्याचा दृढ निश्चय केल्यास वय किंवा झालेला आजारही अडथळा ठरत नाही. हेच एका 52 वर्ष महिलेने सिद्ध केले आहे. आज ही महिला सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
advertisement
2/7
ज्योती पेडणेकर असे या 52 वर्षीय महिलेचे नाव आहे. 15 वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि यात त्या एक वर्ष कोमात होत्या. या आजारपणात ज्योती यांचा डावा हातही निकामी झाला. घरची परिस्थिती तशी बिकटच होती. पती देखील कमावते नसल्यामुळे घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांना सतावत होता. तेव्हा ज्योती मावशींना मदत त्यांच्या स्वयंपाक कौशल्याने केली.
advertisement
3/7
ज्योती मावशी तशा मुळच्या मालवणच्या राहणाऱ्या आहेत. त्यामुळे अस्सल मालवणी पदार्थ तयार करण्याची कला त्यांना अवगत होती. सुगरण असणाऱ्या ज्योती मावशी घरी आलेल्या पाहुण्यांना चविष्ट मालवणी पदार्थ करून खाऊ घालत असत.
advertisement
4/7
अर्धांग वायू झालेला असूनही त्या आता भांडुप येथील राजेशाही गोमंतक या नॉनव्हेज हॉटेलमध्ये काम करत आहेत. या हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक येथे मिळणाऱ्या मालवणी पदार्थाचे कौतुक करतो. एक हात निकामा असूनही राजेशाही गोमंतक मध्ये ज्योती मावशी मालवणी थाळी, कोल्हापुरी थाळी, सोलकढी आदी चविष्ट पदार्थ तयार करतात.
advertisement
5/7
कोरोना काळात कर्जबाजारी झालेल्या ज्योती मावशींचा शोध घेत राजेशाही गोमंतकचे मालक किरण दिव्याला मावशीच्या घरी आले. किरण यांनी मावशीच्या हातचे पदार्थ चाखले. ते त्यांना फार आवडले.
advertisement
6/7
हॉटेलमध्ये जेवण तयार करणे आणि घरात चार माणसांसाठी जेवण तयार करणे यात भरपूर फरक असतो. त्यात मावशींचा निकामा हात पाहून त्या आपल्या सोबत काम कसे करणार? हा सर्वात मोठा प्रश्न किरण यांना पडला. परंतु ज्योती मावशींनी हार न मानता स्वबळावर हॉटेल चालवून दाखवले.
advertisement
7/7
हात निकामा असला म्हणून काय झाले? माझ्या हाताला चव आहे. म्हणत दिवसाच्या 250 ते 300 प्लेट राजेशाही गोमंतक मध्ये विकल्या जातात. ज्योती मावशी नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
अर्धांगवायूनं गाठलं पण हार नाही मानली, ज्योती मावशींच्या हाताची चवच न्यारी