TRENDING:

मुंबईत नोकरी परवडेना, थेट गाव गाठलं अन् सुरू केला वडापावचा गाडा, 5 दिवसात कमावतोय महिन्याचा पगार

Last Updated:
Vadapav Business: मुंबईत कामगार म्हणून राबणारा तरुण गावाकडे आला अन् स्वत:चा मुंबई वडापावचा गाडा सुरू केला. आता जालन्यात त्यानं 5-6 जणांना रोजगार दिला आहे.
advertisement
1/7
मुंबईत नोकरी परवडेना, गाव गाठलं, वडापाव विकून 5 दिवसात कमावतोय महिन्याचा पगार
आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती पाहायला मिळते. दक्षिण भारतात इडली डोसा, उत्तर भारतात छोले भटूरे तर मुंबईमध्ये वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे. या खाद्यसंस्कृतीचे आदानप्रदान देखील मोठ्या प्रमाणावर होते. यामुळेच की काय मुंबईतील खाद्यपदार्थ इतर राज्यात तर इतर राज्यातील खाद्यपदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात मिळतात.
advertisement
2/7
मुंबईतील वडापाव आता जालना शहरामध्ये देखील मिळायला लागला आहे. मुंबई शहरात बालपण गेलेल्या एका तरुणाने जालना शहरात आल्यानंतर स्पेशल मुंबई वडापाव सेंटर सुरू केलंय. एका छोट्याशा गाड्यापासून सुरू केलेल्या व्यवसायातून अर्जुन दिवसे हा तरुण दिवसाला 4 ते 5 हजारांची निव्वळ कमाई करतोय.
advertisement
3/7
अर्जुनचं संपूर्ण बालपण मुंबईतच गेलं. बी.कॉम. चं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात त्याने पीव्हीआर सिनेमामध्ये कामगार म्हणून काही दिवस काम केलं. यानंतर तो जालना शहरामध्ये स्थायिक झाला. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा यादृष्टीने त्याने वडापावचा छोटासा गाडा सत्कार कॉम्प्लेक्स इथे सुरू केला.
advertisement
4/7
अर्जुनच्या वडापावच्या गाड्यावर हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि त्याने आपल्या वडापावमध्ये कल्पकता देखील वाढवत नेली. त्यामुळे छोट्या गाड्याचं रूपांतर मोठ्या दुकानात झालं. आता तो वडापाव सोबत ग्राहकांना सुखी लाल चटणी, हिरवी चटणी आणि लाल चटणी अशा तीन प्रकारच्या चटणी सर्व्ह करत आहे. त्याचबरोबर वडापाव सोबत गोबी आणि तळलेली पापडी देखील ग्राहकांना देतोय.
advertisement
5/7
केवळ 15 रुपयांमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत असल्याने आणि वडापावची चव अत्यंत चांगली असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला जवळपास एक हजार ते दीड हजार वडापावची विक्री या स्टॉलवर होते. 20 ते 25 हजारांची दिवसाची उलाढाल होऊन 4 ते 5 हजारांची निव्वळ कमाई होते.
advertisement
6/7
जालना शहरातील 4 ते 5 तरुणांना या माध्यमातून रोजगार देखील मिळत आहे. आपल्या वडापाव सोबत तीन चटण्या आणि पापडी आपण ग्राहकांना देतो. वडापावची चव अतिशय उत्तम आहे आणि वडापावसाठी वापरलेलं सगळं साहित्य घरीच बनवलेलं आहे, असं अर्जुन सांगतो.
advertisement
7/7
वडापावच्या स्टॉलवर रोज दुपारी बारा वाजल्यापासून ग्राहकांची गर्दी सुरू होते, ती रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असते. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून दिवसाला एक ते दीड हजार वड्यांची विक्री होत असल्याचं, अर्जुन दिवसे याने लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मुंबईत नोकरी परवडेना, थेट गाव गाठलं अन् सुरू केला वडापावचा गाडा, 5 दिवसात कमावतोय महिन्याचा पगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल