TRENDING:

आटवलेले दूध अन् मसाले, तेलंगणातील रगडी चहा जालन्यात, खवय्यांची पसंती

Last Updated:
दूध आटवून बनवलेल्या अस्सल रगडीची चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जुना जालना शहरातील जिंदल कॅपिटलपाशी असलेल्या अण्णा रगडी आणि चहा स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता.
advertisement
1/7
आटवलेले दूध अन् मसाले, तेलंगणातील रगडी चहा जालन्यात, खवय्यांची पसंती
आपल्यापैकी अनेक जण चहा आणि कॉफीचे अस्सल चहाते असतात. तुम्ही देखील चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल तर जालन्यामध्ये रगडी चहा आणि कॉफी मिळतीये. दूध आटवून बनवलेल्या अस्सल रगडीची चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जुना जालना शहरातील जिंदल कॅपिटलपाशी असलेल्या अण्णा रगडी आणि चहा स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता. इथे 15 रुपयांमध्ये रगडी कॉफी तर 10 रुपयांमध्ये दगडी चहा मिळतोय.
advertisement
2/7
जालना शहरातील मंमादेवी परिसरामध्ये राहणारा ओंकार अडियाल हा रगडी चहा आणि कॉफीचा व्यवसाय करतोय. तेलंगाणा राज्यातील कामा रेड्डी या त्याच्या मामाच्या गावी गेल्यानंतर त्याने रगडी चहाचा आस्वाद घेतला आणि त्याला या चहाची चव अतिशय आवडली.
advertisement
3/7
यानंतर महाराष्ट्रात देखील रगडी चहा ही संकल्पना रुजावी म्हणून पाच महिन्यांपूर्वी त्याने रगडीच्या चहा आणि कॉफीचा स्टॉल सुरू केला. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असून सकाळ आणि संध्याकाळ जालनाकरांची इथे मोठी गर्दी असते.
advertisement
4/7
दररोज 500 ते 600 कप चहा कॉफी या दुकानावर विक्री होत आहे. 10 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल होऊन दररोज साडेचार ते 5 हजार रुपयांचा निव्वळ नफा ओंकार कमवतोय.
advertisement
5/7
या चहा कॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरण्यात येणारी रगडी 50 लिटर दूध आटवून आणि त्यामध्ये मसाले घालून तीस लिटर रगडी तयार होते. त्यानंतर या रगडीमध्ये रेगुलर आपण ज्या पद्धतीने चहा आणि कॉफी करतो त्याच पद्धतीने चहा आणि कॉफी तयार केली जाते. घट्ट रगडीमुळे चहा आणि कॉफीला विशेष अशी चव येत असल्याने जालना शहरातील नागरिकांच्या पसंतीस रगडी चहा आणि कॉफी उतरत आहे.
advertisement
6/7
मी माझ्या मामाच्या गावी कामा रेड्डी इथे गेलो असतो. तिकडे रगडी चहा प्यायलो. तिकडची चव मला खूप आवडल्याने जालन्यात देखील हा चहा मिळावा असं मला वाटल. नंतर मी पाच महिन्यांपूर्वी जालन्यात हा व्यवसाय सुरू केला.
advertisement
7/7
जालनेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज साडेनऊ ते 10 हजारांची आर्थिक उलाढाल होत आहे. यातून साडेचार ते 5 हजारांचा निव्वळ नफा मिळत असल्याचं ओंकार अडियाल यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
आटवलेले दूध अन् मसाले, तेलंगणातील रगडी चहा जालन्यात, खवय्यांची पसंती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल