TRENDING:

Success Story : आई-वडील ऊसतोड कामगार, शिक्षण घेतं केली कांदा शेती, प्रवीणने मिळवला 4 लाख निव्वळ नफा

Last Updated:
ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून योग्य नियोजन केल्यास फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे प्रवीण पवार यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे.
advertisement
1/5
आई-वडील ऊसतोड कामगार, शिक्षण घेतं केली कांदा शेती, प्रवीणने मिळवला 4 लाख नफा
बीड जिल्ह्यातील नित्रुड या गावचा तरुण प्रवीण पवार याने शिक्षण घेत असतानाच शेतीतून उल्लेखनीय यश मिळवून दाखवले आहे. सध्या तो कृषी विषयक पदवीचे शिक्षण घेत असून, शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करून अवघ्या दीड एकर क्षेत्रात कांदा लागवडीच्या माध्यमातून तो एका हंगामात साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळवत आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून योग्य नियोजन केल्यास फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे प्रवीण पवार यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे.
advertisement
2/5
प्रवीण पवार यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत साधी आहे. त्यांचे आई-वडील हे ऊसतोड कामगार असून उदरनिर्वाहासाठी दरवर्षी ऊस तोडीसाठी परराज्यात स्थलांतर करतात. अशा परिस्थितीत घरची जबाबदारी सांभाळत शिक्षण पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. मात्र अडचणींवर मात करत प्रवीणने शिक्षण सोडले नाही. उलट कृषी शिक्षणातून मिळणारे ज्ञान स्वतःच्या शेतात वापरण्याचा निर्णय घेतला आणि कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची निवड केली.
advertisement
3/5
कांदा लागवडीसाठी योग्य वाणांची निवड, शास्त्रीय पद्धतीने लागवड, खत आणि पाणी व्यवस्थापन, तसेच कीड आणि रोग नियंत्रण याकडे प्रवीण पवार यांनी विशेष लक्ष दिले. ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करताना उत्पादनात वाढ साधण्यात आली. लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध काम केल्यामुळे उत्पादन खर्च आटोक्यात राहिला आणि बाजारात योग्य वेळ साधून विक्री केल्याने अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाले.
advertisement
4/5
शिक्षण, शेती आणि घरचा कारभार एकाच वेळी सांभाळणे हे कठीण असले तरी प्रवीण पवार यांनी चिकाटीने हे आव्हान पेलले. आई-वडील ऊसतोडीसाठी बाहेर असताना शेतातील सर्व जबाबदारी त्यांनी स्वतः सांभाळली. अभ्यासासोबत प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेतल्यामुळे त्यांचे कृषी शिक्षण अधिक भक्कम झाले. यामुळे भविष्यात शेतीत आणखी नवे प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे.
advertisement
5/5
जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन लाभले, तर ग्रामीण तरुणही शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवू शकतो, हे नित्रुड गावच्या प्रवीण पवार यांच्या यशकथेतून स्पष्ट होते. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरातील अनेक तरुण शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले असून प्रवीण पवार आज ग्रामीण तरुणासाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : आई-वडील ऊसतोड कामगार, शिक्षण घेतं केली कांदा शेती, प्रवीणने मिळवला 4 लाख निव्वळ नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल