TRENDING:

शुद्ध गावरान तुपातली जिलेबी, फक्त 20 रुपये प्लेटमध्ये, खाण्यासाठी गर्दी

Last Updated:
जालना शहरातील शर्मा कुटुंब मागील तीन पिढ्यांपासून शुद्ध तुपापासून तयार केलेली जिलेबी जालना शहरवासीयांच्या सेवेत घेऊन येत आहेत. केवळ 20 रुपये प्लेट या दराने शुद्ध देसी तुपातील जिलेबीची विक्री शर्मा कुटुंबीय करत आहे.
advertisement
1/7
शुद्ध गावरान तुपातली जिलेबी, फक्त 20 रुपये प्लेटमध्ये, खाण्यासाठी गर्दी
जिलेबी हा एक भारतीय पदार्थ आहे. अनेकदा आनंदाच्या क्षणी मिठाईमध्ये जिलेबीला प्राधान्य दिलं जातं. जिलेबीचे प्रदेशानुसार वेगवेगळे प्रकार देखील पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी मैद्यापासून तर काही ठिकाणी खव्यापासूनही जिलेबी तयार केली जाते. मात्र जिलेबी तळण्यासाठी डालड्याचाच वापर केला जातो.
advertisement
2/7
परंतु जालना शहरातील शर्मा कुटुंब मागील तीन पिढ्यांपासून शुद्ध तुपापासून तयार केलेली जिलेबी जालना शहरवासीयांच्या सेवेत घेऊन येत आहेत. केवळ 20 रुपये प्लेट या दराने शुद्ध देसी तुपातील जिलेबीची विक्री शर्मा कुटुंबीय करत आहे. त्याचबरोबर हैदराबाद पर्यंत त्यांनी आपल्या जिलेबीचे पार्सल पाठवले आहे. पाहुयात काय आहे जालना शहरातील महेश शर्मा यांच्या शुद्ध गावरान तुपातील जलेबीची खासियत.
advertisement
3/7
या व्यवसायायाची 75 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. महेश शर्मा यांची शुद्ध जलेबी विक्रीच्या व्यवसायातील तिसरी पिढी आहे. त्यांच्या आजोबापासून हा व्यवसाय जालन्यामध्ये पाहायला मिळतो. रेणुका जलेबी या नावाने त्यांचे शहराच्या मुख्य बाजारपेठेत दुकान आहे. तर महेश शर्मा छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात गायत्री या नावाने शुद्ध जिलेबीचा स्टॉल लावतात.
advertisement
4/7
सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ सहा तास ते गरमागरम जलेबी जालनेकरांच्या सेवेत घेऊन येतात. 440 रुपये प्रति किलो या दराने या जिलेबीची विक्री केली जाते. शर्मा यांचा बहुतांश व्यवसाय हा पार्सलद्वारे होतो.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मनमाड, धुळे आशा ठिकाणी त्यांनी आतापर्यंत जिलेबी पाठवली आहे. जिलेबीला असलेला कुरकुरीतपणा जलेबीचा लहान आकार आणि शुद्ध तुपामुळे येत असलेला फ्लेवर यामुळे ही जलेबी जालना शहरातील नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
6/7
महेश शर्मा हे दिवसाला चार ते पाच किलो जिलेबीची विक्री केवळ सहा तासात करतात. तर पार्सलद्वारे ही दररोज चार ते पाच किलो जिलेबीची विक्री होते अशी दिवसभरात दहा किलो जिलेबी ते विकतात.
advertisement
7/7
खर्च वजा जाता त्यांना दिवसाला एक हजार ते बाराशे रुपये निव्वळ नफा राहतो. तर महिन्याकाठी 30 ते 35 हजार रुपये ते नफा कमवतात. केवळ सहा तासांमध्ये त्यांना चांगला आर्थिक फायदा या व्यवसायामधून होत आहे. त्याचबरोबर जालना शहरातील नागरिकांशी जोडलेली नाळ देखील कायम राहत असल्याचं महेश शर्मा यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
शुद्ध गावरान तुपातली जिलेबी, फक्त 20 रुपये प्लेटमध्ये, खाण्यासाठी गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल