Summer Fruits : उन्हाळ्यात 'हे' 5 पदार्थ खाताना सावधान! अमृतासारखी फळंही ठरू शकतात शरीरासाठी विषारी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Summer Fruits : तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात जी फळं आपल्याला शक्ती देतात, तीच फळं रणरणत्या उन्हात तुमच्या आरोग्यासाठी 'व्हिलन' ठरू शकतात.
advertisement
1/8

बाहेर उन्हाचा कडाका वाढला की आपलं शरीर आपोआप थंडाव्याच्या शोधात असतं. घामावाटे निघून जाणारं पाणी आणि येणारा थकवा दूर करण्यासाठी आपण फळांचा आधार घेतो. रसाळ फळं खाणं आरोग्यासाठी उत्तमच असतं, पण तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात जी फळं आपल्याला शक्ती देतात, तीच फळं रणरणत्या उन्हात तुमच्या आरोग्यासाठी 'व्हिलन' ठरू शकतात.
advertisement
2/8
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक फळाची एक 'तासीर' म्हणजेच प्रकृती असते. काही फळं थंड असतात, तर काही अत्यंत गरम. उन्हाळ्यात चुकीच्या फळांची निवड केल्यास डिहायड्रेशन, पोटात जळजळ आणि त्वचेचे विकार जडू शकतात. खरगोन येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संतोष मौर्य (MD) यांनी उन्हाळ्यात कोणत्या फळांपासून सावध राहावे, याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
3/8
1. पपई: पचनासाठी चांगली, पण उन्हाळ्यात घातक?पपई साधारणपणे पचनासाठी रामबाण मानली जाते. मात्र, पपईची प्रकृती मुळात उष्ण असते. उन्हाळ्याच्या दिवसांत अतिप्रमाणात पपई खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते. यामुळे पित्त होणे, पोटात जळजळ, ॲसिडिटी आणि त्वचेवर रॅशेस येणे अशा समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच पोटाचे विकार आहेत, त्यांनी उन्हाळ्यात पपई जपूनच खावी.
advertisement
4/8
2. खजूर: उन्हाळ्यात ठरू शकतो त्रासाचा कारणहिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी आपण आवर्जून खजूर खातो. पण उन्हाळ्यात हेच खजूर शरीरातील उष्णता प्रचंड वाढवू शकतात. अति खजूर खाल्ल्याने नाकातून रक्त येणे (नकसिर फुटणे), तोंडात फोड येणे आणि कमालीचा अशक्तपणा जाणवू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात खजुराचे सेवन टाळणेच हिताचे ठरते.
advertisement
5/8
3. केळी: दुपारच्या वेळी खाणं टाळाकेळं हे बारमाही मिळणारं फळ आहे. पण उन्हाळ्यात जास्त केळी खाल्ल्याने शरीरात जडपणा जाणवतो आणि पचनाच्या तक्रारी सुरू होतात. केळ्यामुळे शरीरात कफ वाढू शकतो, ज्यामुळे गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो. विशेषतः भर दुपारी कडक उन्हात केळी खाणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
advertisement
6/8
4. आंबा: फळांचा राजा, पण मर्यादेतच बराआंब्याशिवाय उन्हाळा पूर्णच होत नाही, पण लक्षात ठेवा आंब्याची तासीर गरम असते. अतिप्रमाणात आंबे खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुम (पिंपल्स), उष्णतेचे फोड आणि पोटाचे विकार होतात. त्यामुळे आंबा खाताना तो मर्यादेत खावा आणि शक्य असल्यास खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावा, जेणेकरून त्याची उष्णता कमी होईल.
advertisement
7/8
5. लिची: गोड चव पण उष्ण प्रकृती लिची दिसायला रसाळ आणि चवीला गोड असली तरी ती उष्ण प्रकृतीची मानली जाते. जास्त लिची खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. लहाना मुलांना उन्हाळ्यात जास्त लिची देण्यापूर्वी पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
8/8
थोडक्यात सांगायचे तर निसर्गाने प्रत्येक ऋतूला साजेशी फळं दिली आहेत. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज किंवा काकडी यांसारख्या जलमय फळांना प्राधान्य द्या. वरील पाच फळे खायचीच असतील तर ती अतिशय कमी प्रमाणात आणि योग्य वेळी खा, जेणेकरून आरोग्याला बाधा पोहोचणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Fruits : उन्हाळ्यात 'हे' 5 पदार्थ खाताना सावधान! अमृतासारखी फळंही ठरू शकतात शरीरासाठी विषारी