TRENDING:

'लोकं वेडी नाहीत की...', ए. आर. रहमान यांच्या वादग्रस्त विधानावर 'छावा'च्या लेखकाचं सणसणीत उत्तर, कडक शब्दात सुनावलं

Last Updated:
A. R. Rahman Controversy: 'छावा' चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी समाजात फूट पाडणारा चित्रपट म्हटलं. आता यावर चित्रपटाचे लेखक ऋषी विरमानी यांनी मौन सोडलं असून, रहमान यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
1/8
ए. आर. रहमान यांच्या वादग्रस्त विधानावर 'छावा'च्या लेखकाचं सणसणीत उत्तर
जागतिक कीर्तीचे संगीतकार ए. आर. रहमान हे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात, पण गेल्या काही दिवसांत त्यांनी केलेल्या एका विधानाने मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
2/8
ज्या चित्रपटाचे संगीत स्वतः रहमान यांनी दिले, त्याच 'छावा' चित्रपटाला त्यांनी चक्क समाजात फूट पाडणारा चित्रपट म्हटलं. आता यावर चित्रपटाचे लेखक ऋषी विरमानी यांनी मौन सोडलं असून, रहमान यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
3/8
काही दिवसांपूर्वी बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी खळबळजनक दावे केले होते. ते म्हणाले होते की, "गेल्या ८ वर्षांत चित्रपटसृष्टीत सत्तेचं समीकरण बदललं असून निर्णय घेणारे लोक आता फारसे क्रिएटिव्ह राहिलेले नाहीत. 'छावा'सारखे चित्रपट समाजात फूट पाडणारे आहेत. कदाचित माझ्या धर्मामुळेही मला गेल्या काही वर्षांत हवं तसं काम मिळालं नसावे."
advertisement
4/8
स्वतः संगीत दिलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल रहमान यांनी असं विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. रहमान यांच्या या विधानाचा समाचार घेताना लेखकाने स्पष्टपणे सांगितलं की, प्रेक्षक आज खूप सुज्ञ झाले आहेत.
advertisement
5/8
ऋषी विरमानी म्हणाले, "केवळ दोन तासांचा चित्रपट पाहून कोणाची विचारसरणी बदलेल, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. 'छावा'ला प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम दिलं, तसं प्रेम मी गेल्या अनेक वर्षांत पाहिलं नाही. राहिला प्रश्न फूट पाडण्याचा, तर हा एक मनोरंजक चित्रपट आहे. आजची जनता खूप समजूतदार आहे, ती इतकी कच्च्या मनाची नाही की चित्रपटाने भरकटली जाईल. लोकांना काय बरोबर आणि काय चूक हे व्यवस्थित कळतं."
advertisement
6/8
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेला 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि वर्षभरातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.
advertisement
7/8
विक्की कौशलच्या अभिनयासोबतच रहमान यांच्या संगीताचंही त्यावेळी कौतुक झालं होतं. पण आता रहमान यांनी धार्मिक भेदभाव आणि चित्रपटाच्या हेतूवर शंका उपस्थित केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
advertisement
8/8
रहमान यांनी केवळ चित्रपटावरच नाही, तर उद्योगातील वातावरणावरही टीका केली. "काही म्युझिक कंपन्या मुद्दाम मला टाळतात आणि स्वतःचे संगीतकार आणतात," असंही ते म्हणाले होते. मात्र, लेखकाच्या मते, चित्रपटाचे यशच सांगते की प्रेक्षकांनी ही कथा स्वीकारली आहे आणि त्यांच्या मनात कोणतीही फूट पडलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'लोकं वेडी नाहीत की...', ए. आर. रहमान यांच्या वादग्रस्त विधानावर 'छावा'च्या लेखकाचं सणसणीत उत्तर, कडक शब्दात सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल