Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुन्हा थरार; 'तोच' गॅस अन् तसाच अपघात, पण यावेळी शेवट मात्र वेगळा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा प्रोपोलीन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. केरळ राज्यातील कोची येथून गुजरातच्या दहेजकडे प्रोपोलीन गॅस घेऊन जाणारा हा टँकर अमृतांजन पुलाजवळ आला असता, अचानक त्याचे ब्रेक फेल झाले.
advertisement
1/7

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा प्रोपोलीन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. मात्र, चालकाने दाखवलेली समयसूचकता आणि महामार्ग पोलिसांनी दाखवलेली विलक्षण तत्परता यामुळे मोठी वाहतूक कोंडी आणि संभाव्य धोका टळला आहे.
advertisement
2/7
विशेष म्हणजे, मागील काही अपघातांत प्रशासनावर टीका करणाऱ्या प्रवाशांनी आज मात्र यंत्रणेच्या कामाचे मनापासून कौतुक केले. केरळ राज्यातील कोची येथून गुजरातच्या दहेजकडे प्रोपोलीन गॅस घेऊन जाणारा हा टँकर अमृतांजन पुलाजवळ आला असता, अचानक त्याचे ब्रेक फेल झाले.
advertisement
3/7
उतार असल्याने टँकरचा वेग नियंत्रणात आणणे कठीण होते. अशा वेळी टँकर महामार्गावर पलटी झाला असता, तर गॅस गळती होऊन भीषण परिस्थिती निर्माण झाली असती.
advertisement
4/7
टँकर नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान दाखवले. टँकर इतर वाहनांवर किंवा रस्त्यावर पलटी होऊ नये म्हणून त्याने थेट बाजूच्या 'रिटेनिंग वॉल'वर (डोंगराच्या बाजूची भिंत) धडक दिली. यामुळे टँकर सुरक्षितपणे थांबला आणि तो पलटला नाही.
advertisement
5/7
सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, टँकर अपघातग्रस्त होऊनही कुठेही गॅस गळती झाली नाही. सकाळी १० च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने आडोशी बोगद्याजवळील मागील अपघाताचा अनुभव लक्षात घेत तातडीने सूत्रे हलवली.
advertisement
6/7
घटनेनंतर काही वेळातच क्रेन घटनास्थळी पोहोचली. युद्धपातळीवर प्रयत्न करून टँकर बाजूला घेण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. काही काळ वाहतूक धिमी झाली होती, मात्र मागील वेळेसारखा ३२ तासांचा 'वनवास' प्रवाशांच्या नशिबी आला नाही.
advertisement
7/7
नेहमीच वाहतूक कोंडीमुळे टीकेचे धनी होणारे महामार्ग पोलीस आज मात्र हिरो ठरले. प्रशासनाने ज्या गतीने टँकर बाजूला करून रस्ता मोकळा केला, ते पाहून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले. "प्रशासनाने धडा घेतल्याचे आज दिसून आले," अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुन्हा थरार; 'तोच' गॅस अन् तसाच अपघात, पण यावेळी शेवट मात्र वेगळा